Election Commission Gyanesh Kumar Rahul Gandhi  Sarkarnama
देश

ECINET: एकीकडं विरोधकांचा ज्ञानेश कुमारांविरोधात जनमहाभियोग! दुसरीकडं निवडणूक आयोगानं ECINETचा काढला अॅक्सेस

Election Commission: नवी दिल्लीत आज एकीकडं इंडिया आघाडीनं देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रति महाभियोग प्रक्रिया राबवली.

Amit Ujagare

ECINET Access end: नवी दिल्लीत आज एकीकडं इंडिया आघाडीनं देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रति महाभियोग प्रक्रिया राबवली. त्याचबरोबर उद्या १ नोव्हेंबरला विरोधक दिल्लीत रामलीला मैदानावर मोर्चा काढणार आहेत. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं एक मोठा निर्णय घेत उत्तर प्रदेशातील कॉम्प्युटर असिस्टंटचा ECINETचा अॅक्सेस काढून टाकला आहे. विरोधकांच्या सातत्यानं वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

उत्तर प्रदेशात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी इथंही मतदारयाद्या सखोर पडताळणी अर्थात एसआयआरची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारे मतदार याद्यांतील नाव डिलीट करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतले गेले, त्यामुळं आता युपीतल्या प्रक्रियेत असे आरोप टाळण्यासाठी मतदार याद्यांची सुरक्षा आणि पादर्शकता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं ८०६ कॉम्प्युटर असिस्टंटचे ECINET लॉगिन आयडी तत्काळ प्रभावानं डिअॅक्टिव्हेट केले आहेत.

हे पाऊल उचलण्यामागे नेमकं काय कारण आहे? हे सांगताना आयोगानं म्हटलं की, मतदार यादीच्या एसआयआरनंतर पिलीभीत और आजमगढ सारख्या जिल्ह्यात ECINET पोर्टलचे लॉगिन क्रेडेंशिअलचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीनंतर मतदार याद्या व्यवस्थापनात सुरक्षा आणि जबाबदारी अधिक कडक करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलं आहे.

अॅक्सेस परत घेतला जातोय

प्रत्येक विधानसभा जागेवर दोन कॉम्प्युटर असिस्टंट निवडणूक आयोगानं नेमले आहेत. हे लोक इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसरच्या (ERO) कार्यालयात मतदार नोंदणी केंद्रावर ऑपरेटर म्हणून काम करतात. या असिस्टंट्सचा ECINETचा अॅक्सेस परत घेतला जात आहे. कारण हे निश्चित केलं जावं की मतदारांशी संबंधित एन्ट्री थेट जबाबदार अधिकारीच करतील.

ऑपरेटर्सची आता गरज संपली

इंडियन एक्स्प्रेसनं या निर्णयाबाबत एका निवडणूक अधिकाऱ्यानं हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगानं सुरुवातीला कॉम्प्युटर असिस्टंट्सना ECINET पोर्टलचं अॅक्सेस दिला होता. कारण अनेक बीएलओ अॅपवर काम करण्यासाठी व्यवस्थित प्रशिक्षित करण्यात आले नव्हते. पण आता बहुतेक बीएलओना याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळं आता या कॉम्प्युटर ऑपरेटर्सची गरज भासत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT