Rahul Gandhi, Om Birla Sarkarnama
देश

Lok Sabha update : ओम बिर्ला अन् विरोधकांमध्ये आता आरपारची लढाई; पहिल्यांदाच मोठे पाऊल उचलत लोकसभेत थेट भिडणार

No-confidence motion Speaker Om Birla : विरोधक आणि ओम बिर्ला यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे राहुल गांधी.लोकसभा अध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नाही. हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

Rajanand More

Om Birla controversy : मागील आठवड्यात लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेल्या वादाने आता टोक गाठले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लोकसभेत बोलू दिले जात नसल्याचा मुद्दा काँग्रेसकडून सातत्याने संसदेत उचलून धरला जात आहे. अशातच एकामागोमाग एक घडलेल्या काही घटनांनी विरोधक लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत.

विरोधकांनी आता अध्यक्षांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अध्यक्ष बिर्ला यांच्यावर एकतर्फी कामकाज चालविल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात असून आता त्यांच्याविरोधात थेट अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. केवळ काँग्रेसच नव्हे तर विरोधी बाकांवरील सर्वच पक्ष एकजुटीने प्रस्तावाच्या बाजूने उभे राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

अविश्वाव प्रस्तावासाठी लोकसभेच्या महासचिवांना लवकरच नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्षात अविश्वास प्रस्ताव लोकसभेत येऊ शकतो. अद्याप प्रस्तावावर विरोधी खासदारांच्या सह्या झालेल्या नाहीत. विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव आणल्यास सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या बिर्ला यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित राहणार आहेत.

विरोधक का भडकले?

विरोधक आणि बिर्ला यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे राहुल गांधी यांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप. लोकसभा अध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नाही. हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. या गोंधळामुळे काँग्रेसच्या आठ खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आल्याचा रागही विरोधकांच्या मनात आहे.

लोकसभेत ४ फेब्रुवारी काँग्रेसच्या महिला खासदारांनी केलेल्या आंदोलनावरूनही बिर्ला यांनी गंभीर आरोप केले होते. या महिला खासदारांकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना धोका होता, असा अप्रत्यक्ष आरोपच बिर्ला यांनी केला होता. त्यावरूनही विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. त्याचप्रमाणे सत्ताधारी बाकांवरील खासदारांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. या मुद्द्यांवर आता बिर्ला यांना थेट भिडण्याची तयारी विरोधकांनी केल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT