Rahul Gandhi News : राहुल गांधींनी मोदी-शहांसह राजनाथ सिंह यांना कसे दाखवले ‘फोर स्टार…’? सगळेच पडले बुचकळ्यात...

General Manoj Naravane book : लोकसभेतील गोंधळानंतर राहुल गांधींनी जनरल नरवणे यांचे 'Four Stars of Destiny' 2024’ हे अप्रकाशित असल्याचा दावा केले जाणारे पुस्तकच संसदेत आणले.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSarkarnama
Published on
Updated on

Unpublished military book issue : मागील आठवड्यात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून संसदेत जोरदार हंगामा झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकातील एका लेखामध्ये प्रसिध्द झालेला मजकूर लोकसभेत वाचून दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हे पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नाही, त्यामुळे अप्रकाशित पुस्तकातील मजकूर वाचता येणार नाही, असे सांगत त्यांना विरोध केला होता.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही नियमांवर बोट ठेवत राहुल गांधींना मजकूर वाचण्यापासून रोखले. सलग दोन दिवस राहुल यांच्याकडून लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांना वारंवार रोखण्यात आले. त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेद्र मोदींनाही लोकसभेत भाषण करता आले नाही.

लोकसभेतील गोंधळानंतर राहुल गांधींनी जनरल नरवणे यांचे 'Four Stars of Destiny' 2024’ हे अप्रकाशित असल्याचा दावा केले जाणारे पुस्तकच संसदेत आणले. मीडियासमोर त्यांनी हे पुस्तक हातात उंचावून दाखविले. हे पुस्तक परदेशात उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला. भारतात ते का प्रसिध्द होऊ दिले जात नाही, याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली.

Rahul Gandhi News
Mohan Bhagwat News : संघाने सांगितले तर निवृत्त..! 75 वर्षे पूर्ण, मोहन भागवत थेट बोलले; भाजपमुळे चांगले दिवस नाहीत तर...   

जनरल नरवणे यांचे पुस्तक २०२४ मध्येच प्रसिध्द होणार होते. या पुस्तकासाठी मोठ्या प्रमाणात वाचकांकडून नोंदणीही झाली होती. पण अचानक पुस्तकाचे प्रकाशन रोखण्यात आल्याचे सांगितले जाते. मग असे असतानाह राहुल यांना हे पुस्तक कुठून मिळाले, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्यावरून वेगळाच वाद निर्माण झाला आहे.

पुस्तकामध्ये जनरल नरवणे यांच्या चार दशकांपासूनच्या सैन्यदलातील करिअरवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामध्ये चीनशी झालेल्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आला असून त्यामध्येच पंतप्रधान मोदींशी संबंधित काही वादग्रस्त मजूकर असल्याचा दावा राहुल यांच्याकडून केल जात आहे. प्रकाशकांनी हे पुस्तक मंजुरीसाठी संरक्षण खात्याकडे पाठविल्याचे जनरल नरवणे यांनीच स्पष्ट केले आहे.

Rahul Gandhi News
ब्रिटीश महिलेशी 2010 मध्ये ओळख, तीन वर्षांत लग्न..! खासदार अडकला भारतविरोधी षडयंत्रात?

अद्याप संरक्षण विभागाने या पुस्तकाला हिरवा कंदील दाखविलेला नाही. विशेष म्हणजे २०२० ते २०२४ या कालावधीत संरक्षण विभागाने लष्कराशी संबंधित ३५ पुस्तकांना मंजुरीला दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जनरल नरवणे यांच्या पुस्तकाची अजूनही चिरफाड सुरू आहे. या पुस्तकातील काही संवेदनशील आणि सरकारच्या धोरणांवर टीकात्म मजकुरांमुळे पुस्तक रोखण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.

पुस्तक कसे उपलब्ध?

पुस्तक संरक्षण खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले जात असताना ते राहुल गांधींना कुठून मिळाले, असा प्रश्न आहे. साधारणपणे लष्कराशी संबंधित पुस्तकांचा मसुदा आधी मंत्रालयाकडे पाठविला जातो. ऑफिशिअल सिक्रेट कायद्यामुळे या पुस्तकांमध्ये संवेदनशील माहिती प्रकाशित करता येत नाही. तो गुन्हा ठरतो. त्यामुळे अनेक माजी अधिकारी पुस्तकांना मंत्रालयाकडून प्रकाशनाआधी मंजुरी घेतात. नरवणे यांच्या पुस्तकाबाबत मात्र नेमके काय घडले, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Rahul Gandhi News
Lok Sabha update : पंतप्रधान मोदींसह आणखी एक व्यक्ती होती महिला खासदारांच्या टार्गेटवर; केंद्रीय मंत्र्यांकडून धक्कादायक खुलासा

जनरल नरवणे यांच्या पुस्तकाच्या काही प्रती २०२४ मध्येच छापण्यात आल्या होत्या. त्या दिल्लीतील काही मोजक्या दुकानांपर्यंत पोहचविण्यात आल्या होत्या. पण त्याचवेळी वाद निर्माण झाल्यानंतर या प्रती परत घेण्यात आल्या होत्या. संरक्षण खात्याकडून मंजुरीआधीच पुस्तकांच्या प्रती कशा उपलब्ध झाल्या, याबाबत प्रकाशकांकडून अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे संसदेपर्यंत पुस्तकाची प्रत पोहोचल्याने सगळेच चक्रावून गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com