Sharad pawar Sarkarnama
देश

Opposition Meeting in Patna : मोदी सरकारच्या विरोधात 'विरोधी' हुंकार; बैठकीपूर्वी शरद पवार म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Bihar News : आगामी २०२४ च्या लोकसभेसाठी रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राजद आणि आपसह डझनहून अधिक पक्षांच्या नेत्यांची आज (दि.२३ जून) पाटणा येथे बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गट शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, फारुख अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन पाटणा येथे पोहोचले आहेत. (Patna opposition meeting LIVE UPDATES)

दरम्यान, विरोधकांची या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यावर भाष्य केले आहे. तसेच, पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलवलेल्या या बैठकीला शरद पवार पाटण्यात पोहचले आहेत. दरम्यान, आज सकाळी पाटण्याला निघण्याआधी पवारांनी माध्यमांशी संवाध साधला आहे.

शरद पवार म्हणाले की, देशाला भेडसावणाऱ्य महत्वाच्या प्रश्नांवर बैठकीत सर्व विरोधी पक्ष मिळून चर्चा करणार आहोत. देशातील काही राज्यांमध्ये जसे मणिपूर असेल, कुठल्यातरी कारणामुळे रस्त्यावर हिंसाचार होत आहे. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट होत आहे. विशेषत: जिथे भाजपची सत्ता नाही, त्या राज्यांमध्ये असे प्रकार घडत आहेत, त्यामुळे याच्या पाठिमागे कोण आहे, हे स्पष्ट होत आहे. देशाच्या दृष्टीने हे योग्य नाही. यासगळ्या गोष्टींवर विरोधी पक्षांच्या बैठकीत एकत्रित विचार केला जाईल.

पाटणा येथे आज भाजपविरोधात देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. देशभरातील जवळपास १५ भाजपविरोधी पक्ष एकत्र येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकींसाठी रणनीती आखण्यात येणार आहे. या बैठकीत लोकभा निवडणुकीसाठी विरोधकांचा प्रमुख नेत्याच्या चेहऱ्यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT