India vs Pakistan Military Power Overview Sarkarnama
देश

Pahalgam Attack News: पाकिस्तानच्या तुलनेत भारत कसा आहे बलाढ्य; तीनही सैन्यदलांची ताकद जाणून घ्या!

India vs Pakistan Military Power Overview: ग्लोबल फायर पावर इंडेक्सच्या अहवालानुसार लष्कर शक्तीच्या तुलनेत भारत पाकिस्तान पेक्षा पुढे आहे. जगात सैन्यदलाचा विचार केला तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान 12 व्या क्रमांकावर आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pahalgam Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी झालेल्या मोदी सरकारच्या सीसीएसच्या बैठकीत भारताने पाकिस्तानबाबत पाच मोठे निर्णय घेतले आहेत.

पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंद करण्यात आला असून व्हिसा बंदी करण्यात आली आहे. अटारी आणि वाघाबॉर्डर बंद करण्यात आली असून पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.

लष्कराच्याबाबत भारत पाकिस्तानपेक्षा बलाढ्य आहे. ग्लोबल फायर पावर इंडेक्सच्या अहवालानुसार लष्कर शक्तीच्या तुलनेत भारत पाकिस्तान पेक्षा पुढे आहे. जगात सैन्यदलाचा विचार केला तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान 12 व्या क्रमांकावर आहे.

जवानंनी संख्या 14.55 लाख आहे. 11.55 लाख रिजर्व फोर्स आहे. अन्य लष्करी जवानांच्या तुलनेत भारत बलाढ्य आहे. पैरामिलिट्री लष्करी जवानांची संख्या 25 लाख 27 हजार आहे. गेल्या काही वर्षात भारताचा डिफेन्स बजेट वाढविण्यात आला आहे.

सध्या भारताचा सरंक्षण मंत्र्यालयाचा बजेट 77.4 अरब डॉलर आहे. म्हणजे 681210 कोटी रुपये बजेट आहे. भारताचा हवाई दल सर्वात मजबूत आहे. सध्या देशाकडे 2,229 एयरक्राफ्ट आहेत. 600 फाइटर जेट असून 899 हेलिकॉप्टर आहेत.

नौदलाकडे 150 मोठ्या युद्धनौका आहेत, 18 पानबु्ड्या, 2 एअरक्राफ्ट (INS विक्रमादित्य और INS विक्रांत) आहेत. T-90 भीष्म, अर्जुन टैंक, ब्रह्मोस मिसाइल, पिनाका रॉकेट आहेत. ही युद्ध यंत्रणा कुठल्याही शत्रूचा थरकाप उडवेल अशीच आहे.

प्रमुख निर्णय कोणते?

  1. अटारी-वाघा बॉर्डर तत्काळ प्रभावाने बंद करणार

  2. सिंधू जल कराराला स्थगिती

  3. पाकिस्तानी नागरिकांना आता व्हिसा मिळणार नाही.

  4. पाकिस्तान हायकमिशनच्या अधिकाऱ्यांना परत जाण्याचे आदेश

  5. पाकिस्तानी नागिरकांनी ४८ तासांत भारत सोडावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT