Kasuri Pahalgam sarkarnama
देश

Kasuri Pahalgam Video : पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड कसुरीच्या उलट्या बोंबा; म्हणतोय, 'पाकिस्तान जबाबदार नाही'

Pahalgam Terror Attack Saifullah Kasuri : सैफुल्लाह कसुरीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये जो आंतकवादी हल्ला झाला त्याची आम्ही निंदा करतो. या हल्ल्याच्या आडून भारतीय मीडिया मला यासाठी जबाबदार धरत आहे.

Roshan More

Saifullah Kasuri Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडवर आहे. भारतातने पाकिस्तानवर निर्बंध लादत सिंधू कराराला स्थगिती दिली आहे. पहलगामध्ये हल्ल्यामागे लष्कर ए तैयबाचा डिप्टी कमांडर सैफुल्लाह कसुरी याचा हाथ असल्याचा संशय आहे. भारत सरकारकडून पाकिस्तानवर केलेल्या कारवाई नंतर कसुरीचा एका व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने हल्ल्याचा निषेध केला तसेच या हल्ल्यालाआपण जबाबदार नसल्याचे सांगितले.

बुधवारी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीत पाच मोठे निर्णय घेत पाकिस्तानला इशारा देण्यात आला. त्यानतंर सैफुल्लाह कसुरी याचा व्हिडिओ समोर आला. त्याने या व्हिडिओमध्ये या आतंकवादी हल्ल्याशी आपले काही देणेघेणे नाही. पाकिस्तानचाही याच्याशी काही संबंध नाही. उलट हा भारताचाच डाव आहे.

भारत जंगी दुश्मन

कसुरीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये जो आंतकवादी हल्ला झाला त्याची आम्ही निंदा करतो. या हल्ल्याच्या आडून भारतीय मीडिया मला यासाठी जबाबदार धरत आहे. पाकिस्तानवरही आरोप केले आहेत. हे चुकीचे आहे. भारताला पाकिस्तानला नष्ट करायचे आहे. कश्मीरमध्ये 10 लाख सैनिक पाठवून भारताने युद्धाचे वातावरण बनवले आहे. भारत हा जंगी दुश्मन आहे.

भारताकडून कट केल्याचा आरोप

कसुरी याने म्हटले आहे की, भारताने स्वतः पहलगाममध्ये हल्ला केला आहे. आणि याची जबाबदारी तो दुसऱ्यांवर ढकलत आहे. हे एक षडयंत्र आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे काही देणेघेणे नाही.

भारताचा पाकिस्तानला दणका

भारताच्या कॅबिनेट सुरक्षा समितीने सिंधू कराराला स्थगिती दिली आहे. तसेच व्हिसावर पाकिस्तानातून भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. भारताकडून हल्ला होण्याची पाकिस्तानला भीती आहे. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT