Pahalgam Terror Attack : PM मोदींनी सिंधूचं पाणी अडवताच सुरक्षा दलानेही दहशतवाद्यांचा फास आवळला! 1500 हून अधिक जण ताब्यात

India Pakistan conflict : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेत सिंधू पाणी करार स्थगीत केला आहे. भारताचा हा निर्णय म्हणजे पाकिस्तानला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे भारत सरकारने चारीबाजूंनी पाकिस्तानची कोंडी करायला सुरूवात केली आहे.
Border security India
Border security IndiaSarkarnama
Published on
Updated on

India Pakistan conflict : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेत सिंधू पाणी करार स्थगीत केला आहे. भारताचा हा निर्णय म्हणजे पाकिस्तानला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

एकीकडे भारत सरकारने चारीबाजूंनी पाकिस्तानची कोंडी करायला सुरूवात केली आहे. तर तिकडे भारतीय सैन्याने देखील दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मोहीम उघडली आहे. त्यानुसार भारतीय सुरक्षा दलांनी पहलगाम आणि आसपासच्या खोऱ्यातून तब्बल 1500 हून अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे.

यामध्ये ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) किंवा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांचा समावेश आहे. दरम्यान, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाच मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आता 48 तासांच्या आत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावा लागणार आहे. तसंच 1960 चा सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे.

Border security India
India Pakistan water conflict : PM मोदींचा वॉटर स्ट्राईक; सिंधू जल कराराला स्थगिती; पाकिस्तानवर होणार भयंकर परिणाम

पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करत नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कामय राहणार असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने जोरदार फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यानंतर घनदाट जंगलांनी वेढलेल्या पर्यटन स्थळी दहशतवादी कसे पोहोचले असावेत आणि ते कुठे गेले असावेत या संभाव्य मार्गांबाबतची माहिती त्यांनी यावेळी घेतली.

दरम्यान, संपूर्ण देशभरातून दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. जनभावना लक्षात घेता गृहमंत्री अमित शाह यांनी देखील कोणत्याही परिस्थित कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Border security India
CCS Meeting : पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली CCS बैठक; पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी मोठे निर्णय!

तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, धर्माच्या आधारे पर्यंटकांची हत्या करणे, निर्दोषांना ठार करणे हे कृत्य निंदनीय दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे मागील इतिहास पाहता भारत या दहशतवादी हल्ल्याला देखील जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com