Pahalgam Terror Attack, NIA Investigation Sarkarnama
देश

Pahalgam Terror Attack : धर्म विचारून हत्या, पहलगाममध्ये 2023 चा सेम पॅटर्न! जम्मूतील तुरुंगात असलेल्या 'त्या' दोघांची NIA कडून चौकशी सुरू

NIA Investigation : पहलगाम येथे हल्ला करणारा दहशतवादी हाशिम मुसा साथीदारांसह काश्मिरच्या जंगलात लपल्याची माहिती समोर आली आहे. जंगलात रस्ते शोधण्यासाठी दहशतवाद्यांकडून इंटरनेटशिवाय वापरता येणाऱ्या अॅल्पाईन क्वेस्ट मोबाईल अॅपचा वापर केल्याचं उघडकीस आलं आहे.

Jagdish Patil

Jammu Kashmir news, 03 May : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांचा कायमचा बिमोड करा, अशी मागणी देशभरातून होत आहे. यासाठी पहलगाम येथे हल्ला करणाऱ्यांना शोधण्यासाठी भारतीय लष्कर आणि एनआयएकडून कसून तपास सुरू आहे.

याच हल्ल्याची चौकशी करणारे एनआयएचे एक पथक जम्मूमध्ये पोहोचले आहे. या पथकाने शुक्रवारी जम्मूतील कोट भालवाल तुरूंगाला भेट देत निसार अहमद आणि मुश्ताक हुसेन नावाच्या दोन संशयितांची चौकशी केल्याची माहिती आहे.

जानेवारी 2023 मध्ये राजौरीतील डांगरी येथील दहशतवादी हल्ल्यात या दोघांनी दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली या दोघांनाही अटक करण्यात आली होती. या हल्ल्यात देखील दहशतवाद्यांनी पीडितांना धर्म विचारून त्यांची हत्या केली होती.

आता पहलगाममध्ये झालेला हल्ला देखील अशाच पद्धतीचा असल्यामुळे या हल्ल्यामागील कट रचणाऱ्यांची काही माहिती मिळावी यासाठी मुश्ताक आणि निसार यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

शिवाय घनदाट जंगलात हल्लेखोर कुठे लपू शकतात, याबाबतची माहिती मिळाल्यास तपासाला गती येऊ शकते. तर तिकडे पहलगाम येथे हल्ला करणारा दहशतवादी हाशिम मुसा साथीदारांसह काश्मिरच्या जंगलात लपल्याची माहिती समोर आली आहे.

जंगलात रस्ते शोधण्यासाठी दहशतवाद्यांकडून इंटरनेटशिवाय वापरता येणाऱ्या अॅल्पाईन क्वेस्ट मोबाईल अॅपचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT