Global leaders express solidarity with India after the Pahalgam terror attack, issuing stern warnings to Pakistan and terror groups Sarkarnama
देश

Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांना भरली धडकी, पाकिस्तानचाही हिशेब चुकता होणार; जगभरातून भारताला पाठिंबा!

Overview of the Pahalgam Terrorist Attack : जाणून घ्या, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर जगभरातील कोणत्या देशाने काय मांडली भूमिका?

Mayur Ratnaparkhe

warning to Pakistan after terrorist strike : जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारतात संतापाची भावाना आहे, तर जगभरातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या हल्ल्यावरून पाकिस्तानवरही टीका सुरू आहे. अनेक देशांनी भारताच्या भूमिकेचे समर्थन केले असून, दहशतवादाविरोधात कडक कारवाई झाली पाहीजे अशीच भूमिका मांडली आहे.

अमेरिका -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्य्यावर बोलताना सांगितले की, मी भारत आणि पाकिस्तानच्या अतिशय जवळ जवळचा आहे. काश्मीर मुद्य्यावर ते दोघेही जवळपास अनेक वर्षांपासून लढत आहेत, कदाचित त्यापेक्षाही अधिक कालावधीपासून. पहलगाममध्ये झालेला हल्ला चुकीचा होता. मला खात्री आहे की कोणत्याना कोणत्या प्रकारे हा मुद्दा सोडवला जाईल. पाकिस्तान आणि भारतामध्ये अतिशय तणाव आहे, मात्र नेहमीच राहिलेला आहे.

रशिया -

या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. त्यांनी म्हटले होते की, दोषींना शिक्षा मिळेल. आम्ही भारतासोबत ठामपणे उभा आहोत. या हल्ल्यात जखमी झालेल्यांबाबत पूर्णपणे संवेदना आहेत आणि त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो आहोत.

इस्त्रायल -

इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यान्याहू यंनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदी, मी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या निघृण दहशतवादी हल्ल्याने अतिशय व्यथित आहे. ज्यामध्ये अनेकजण मारले गेले आणि जखमी झाले आहेत. आमच्या संवेदना आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. दहशतवादाविरोधातील लढाईत भारत इस्त्रायलच्या सोबत उभा आहे.

इराण -

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावादरम्यान इराणने शुक्रवारी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचे आव्हान केले. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले की, भारत आणि पाकिस्तान इराणचे शेजारी आहेत. ज्यांच्यात शतकानुशतकांचे उत्तम सांस्कृतिक आणि सभ्यतांचे संबंध आहेत. अन्य शेजाऱ्यांप्रमाणे आम्ही त्यांना सर्वोच्च प्राथमिकता मानतो आहोत.

सौदी अरब -

याशिवाय सौदी अरेबियाने देखील भारत आणि पाकिस्तानामधील शत्रुत्वाबाबत चिंता व्यक्त केली. त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या त्यांच्या समकक्षांशी फोनवर चर्चा केली.

श्रीलंका -

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा दिसानायके यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील निर्दोष नागरिकांच्या मृत्यूवर आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि या जघन्य कृत्याचा निषेध नोंदवला. फोनवर बोलल्यानंतर दिसानायके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मोठा धक्का बसला आहे. ज्यामध्ये २६ निर्दोष व्यक्तींचा जीव गेला आहे. श्रीलंकेची एकता आणि दहशतवादाविरोधातील आमची सामायिक वचनबद्धता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या संवेदना व्यक्त करतो. या कठीण काळात आम्ही भारतासोबत आहोत.

ब्रिटन -

याआधी शुक्रवारी ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टारमर आणि नेदरलँडचे पंतप्रधान डिक शूफ यांनीही पंतप्रधान मोदींना फोन केला आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत असल्याचे सांगितले. ब्रिटनचे पंतप्रधान आवास 10 डाउनिंग स्ट्रीटद्वारे जारी एक निवेदनात सांगितले गेले की, ब्रिटिश पंतप्रधानांनी शुक्रवारी सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी हे सांगत सुरुवात केली की, मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याने आम्ही स्तब्ध आहोत. ज्यामध्ये २६ निर्दोष नागरिकांचा दुख:द मृत्यू झाला.तसेच त्यांनी ब्रिटिश नागिरकांच्यावतीनेही सर्व पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या आणि दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली.

नेदरलँड -

नेदरलँडचे पंतप्रधान शूफ यांनीही या भ्याड हल्ल्याची तीव्र निषेध नोंदवला आणि दहशवादाच्या सर्व प्रकारांना आणि प्रकटीकरणांना विरोध दर्शवला. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदींनी शूफ यांचे त्यांनी दर्शवलेल्या पाठिंब्याबद्दल आणि एकजुटीच्या शब्दांबद्दल आभार मानले. तसेच म्हटले की भारत दहशतवादाविरोधात जागतिक लढाई मजबूत करण्यासाठी नेदरलँडसोबत मिळून काम करण्यास तत्पर आहे.त्याची तीव्र निषेध नोंदवला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT