RSS Chief Mohan Bhagwat addresses the media following the Pahalgam terrorist attack, triggering intense national debate Sarkarnama
देश

Mohan Bhagwat Statement : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरसंघचालक भागवत यांचे मोठे विधान; चर्चांना उधाण!

Mohan Bhagwat’s Major Statement Explained : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतप्त भावना उमटत आहेत.

Mayur Ratnaparkhe

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतप्त भावना उमटत आहेत. शिवाय जगभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. भारतानेही या हल्ल्याला अतिशय कठोर असे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिलेला आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही या दहशतवादी हल्ल्यावर मोठं विधान आलं आहे.

मोहन भागवत यांनी शनिवारी म्हटले की, अहिंसा आपला धर्म आहे, परंतु अत्याचारिंना दंड देणे देखील त्याच अहिंसेचे एक रूप आहे. मोहन भागवत यांनी हे विधान हिंदू मेनिफेस्टो नावाच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमास संबोधित करताना केले आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, भारत आपल्या परंपरेनुसार कधीच कोणत्या शेजारी राष्ट्रास नुकसान पोहचवत नाही. परंतु जर कोणता देश किंवा गट चुकीचा मार्ग अवलंबवतो आणि अत्याचार करत असेल तर राजाचे(केंद्र सरकार) कर्तव्य असते  की त्याने आपल्या प्रजेचे रक्षण करावे.

मोहन भागवत यांचे हे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा भारताने दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. भलेही मोहन भागवतांनी आपल्या संबोधनात पाकिस्तानचा उल्लेख केला नाही, परंतु त्यांचा रोख पाकिस्तानकडेच असल्याचे बोललं जात आहे.

 तसेच मोहन भागवतांनी म्हटले की, देवाने रावणाचा संहार केला होता, ती हिंसा नव्हती. अत्याचारिंना रोखणे धर्म आहे. राजाचे कर्तव्य आहे की त्याने जनतेचे रक्षण करावे आणि दोषिंना योग्य दंड द्यावा.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT