Pakistan Airstrike Hits Kabul Hospital, 400 Reported Dead Sarkarnama
देश

Pakistan Airstrike in Kabul: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक, 400 जणांचा मृत्यू, हॉस्पिटलवर बॉम्ब टाकला

Pakistan airstrike Afghanistan, Kabul hospital bomb blast: पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक केल्याची धक्कादायक घटना. काबुलमधील मोठ्या हॉस्पिटलजवळ बॉम्बहल्ला झाल्याने सुमारे 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.

Mangesh Mahale

Kabul airstrike 400 deaths report: इस्त्रायल- इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धांचा आज १८ वा दिवस आहे. अशातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या संघर्ष वाढला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पाकिस्तानने केलेल्या भीषण एअरस्ट्राईकमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे, सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

पाकिस्तान केलेल्या एअर स्ट्राईकने काबुल येथील एका नशामुक्ती केंद्र उद्धवस्थ झाले आहे. यात 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 250 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. पण पाकिस्ताने हे आरोप खोडून काढले आहे. आम्ही कुठल्याही मानवी वस्तीवर हल्ला केलेला नाही, पाकिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या या एअरस्ट्राईकमुळे काबुलच्या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये अनेक रुग्ण आणि सामान्य नागरिकांचा समावेश असल्याचे तालिबान सरकारने म्हटले आहे.

काबुलच्या एका नशामुक्ति केंद्रावर पाकिस्तानने हल्ला केला आहे. यात हॉस्पीटलचा मोठा भाग उद्धवस्थ झाला आहे. यात मृतांमध्ये अधिक व्यक्ती या रुग्ण होते. उपचारासाठी ते याठिकाणी आले होते, असे तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी म्हटले आहे.

हॉस्पिटलचा मोठा भाग या हल्ल्यात उद्ध्वस्त झाला आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला हा आकडा २५० सांगण्यात आला होता, मात्र अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या ४०० पर्यंत वाढल्याचा दावा केला आहे. याशिवाय २५० हून अधिक लोक जखमी आहेत.

रमजानच्या २८ व्या रात्री...

"रमजानच्या २८ व्या रात्री आशा पल्लवित करण्यासाठी आलेल्या रुग्णांची हत्या करण्यात आली, हे अत्यंत वेदनादायक आहे", असे अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद नबी यांने म्हटले आहे. त्याने समाज माध्यमावर व्हिडिओ शेअर करीत दु:ख व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT