Pakistani citizens participate in ‘Yom-e-Tashakkur’ celebrations, reflecting gratitude and hope for sustained peace with India. Sarkarnama
देश

India-Pakistan Ceasefire : पाकिस्तानने साजरा केला 'यौम-ए-तशक्कूर', शस्त्रसंधीसोबत आहे कनेक्शन

What is Yom-e-Tashakkur : पाकिस्तानच्या लष्काराने अधिकृतरित्या जाहीर केले की एकही भारतीय सैनिक त्यांच्या ताब्यात नाही. भारतीय मीडियामध्ये चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवल्या जात आहे.

Roshan More

India Vs Pakistan : भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. आज (सोमवारी) दोन्ही देशांचे डीजीएमओ यांच्यामध्ये बैठक होत आहे. या बैठकीच्या आधीच पाकिस्तानमध्ये 'यौम-ए-तशक्कूर' साजरा करण्यात आला. यौम-ए-तशक्कूर साजरा करण्याविषयी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारीच केली होती.

पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जाहीर केले भारताच्या विरोधात लष्कराचे ‘बुनयान अल मरसूस’ हे ऑपरेशन यशस्वी झाले. त्यामुळे यौम-ए-तशक्कूर साजरे केले जावे.यौम-ए-तशक्कूर हा एक उर्दू शब्द आहे. त्याचा अर्थ होतो आभार मानण्याचा दिवस.

शस्त्रसंधी हे पाकिस्तानचे यश आहे त्यामुळे यौम-ए-तशक्कूर साजरा करण्याचे आवाहन शरीफ यांनी केले होते. विशेष म्हणजे शस्त्रसंधीसाठी विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली होती. पाकिस्तानचे नऊ तळ भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले आहे तरी पाकिस्तान सरकार आपली कशी सरशी झाली आहे, हे पाकिस्तानच्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

भारताचा एकही सैनिक ताब्यात नाही

पाकिस्तानच्या लष्काराने अधिकृतरित्या जाहीर केले की एकही भारतीय सैनिक त्यांच्या ताब्यात नाही. भारतीय मीडियामध्ये चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवल्या जात आहे. सोशल मीडियावर दावा केला जातो आहे की भारतीय महिला वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात आहे. मात्र, एकही भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचे पाकिस्ताने लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी जाहीर केले.

बुनयान अल मरसूस म्हणजे काय?

भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून पाकिस्तान घुसून दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान अल मरसूस जाहीर केले. बुनयान अल मरसूसचा अर्थ होतो मजबूत भिंत. मात्र, ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानात घूसून 9 एअरबेस नष्ट केले. त्यामुळे ऑपरेशन बुनयान अल मरसूस किती कमकुवत होते हे जगाला दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT