
Mumbai News : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने मोठा निर्णय घेत पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली. यानंतर हादरलेल्या पाकिस्तानकडून चार दिवस भारताच्या कुरापती काढण्याचेच काम सुरू आहे. यादरम्यान आता पुन्हा पाकिस्तानने काही केल्यास कठोर पावले उचलले जातील असा इशाराच भारताने दिलाय. यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला. दरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर अखेर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी लागू केली. मात्र याची माहिती पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिल्यावरून आता विरोधक जोरदार टीका करत आहेत. याचमुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले असून थेट मोदींनाच सवाल केला आहे.
आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी, जेव्हा जेव्हा परकीय आक्रमण झाली तेव्हा आपण भारताच्या लष्कराच्या मागे ठाम उभे राहिलो आहे आणि पुढेही राहीन. पण आता काही प्रश्न असे आहेत की यामुळे चिंता निर्माण झाली आहे. युद्धविरामाची माहिती पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळाली. जी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा एस.जयशंकर यांच्याकडून मिळायला हवी होती. मात्र ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एका ट्विटमधून मिळाली. यामुळे मोदींचं नेतृत्त्व कमकूवत वाटतं असल्याची त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी, परराष्ट्र मंत्रालयाच्या मीडिया ब्रीफिंगवरून स्पष्ट होतं की संघर्षात भारताचा वरचष्मा होता. पाकिस्तानही हल्ले करत होता. मग अमेरिकेच्या सांगण्यावर शस्त्रसंधी का? याचा अर्थ युद्धविरामासाठी अमेरिकेचा आपल्यावर दबाव होता? की त्यांनी पाकिस्तानला वाचवलं. पाकिस्तानने चीनसह अन्य जागतिक शक्तींशी धोरणात्मक भागीदारी निर्माण करून अमेरिकेवरची आर्थिक व लष्करी अवलंबनता बरीच कमी केली आहे. मग अमेरिका पुन्हा पाकिस्तानची बाजू का घेत आहे, असा सवाल केला आहे.
सध्याच्या घडीला पाकिस्तानकडे मर्यादित म्हणजेच फक्त 10 पूरेल असा शस्त्रसाठा होता. अशावेळी पाकिस्तानी दहशतवादाचा कायमचा शेवट करण्याची संधी भारताकडे होती. पण आता तिही गमावण्यात आली? उलट पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी अमेरिका, चीन आणि तुर्कीने दिलेल्या लष्करी उपकरणांचा वापर केला. 8 मे रोजी भारतीय ड्रोनच्या माऱ्यानंतर पाकिस्तानने 36 वेगवेगळ्या ठिकाणी 300 ते 400 ड्रोन हल्ले केले. घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, ही बाब आपल्या लष्कराच्या मीडिया ब्रीफिंगमध्ये स्पष्ट झाली होती.
याच ब्रीफिंगमध्ये, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरैशी पाकिस्तानमध्ये, पाक लष्कराच्या उपस्थितीत दहशतवाद्यांच्या राज्यदर्जा अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे फोटो दाखवले होते. तर तुर्की, अझरबैजान आणि चीन पाकिस्तानच्या बाजूने उभे असल्याचेही आपल्या उघड झाले होते. आता हे देश अमेरिका, तुर्की, अझरबैजान आणि चीन भविष्यात भारतातील पाकिस्तानी दहशतवादाची जबाबदारी घेणार का? असाही सवाल आंबेडकर यांनी केला आहे.
चीन आणि इतर जागतिक शक्तींशी धोरणात्मक भागीदारी करून पाकिस्तानने अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी मदत कमी केली आहे. आता पाकिस्तान चीन आणि तुर्कीवर अवलंबून आहे. तर आताची स्थिती पाकिस्तानच्या विरोधात असल्यानेच अमेरिकेने ही एक संधी म्हणून हेरलं आहे. त्यानंतरच पाकिस्तानच्या समर्थनात पाऊल टाकत शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. तसेच याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प दोन भारताबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र यामागे त्यांचा हेतू हा काश्मीरवर तोडगा काढण्याचे नसून पाकिस्तानसोबतचा व्यापार वाढवणे आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या विधानात काश्मीरचा उल्लेख केला नाही. कारण त्यांच्यासाठी तो मुद्दा गरजेचा नाही. पण तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. तर अमेरिकेला पाकिस्तानसोबत व्यापार वाढवायचा असून यासाठीच अमेरिका मदत करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आता अमेरिकेच्या मदतीमुळे आर्थिकदृष्ट्या समर्थित पाकिस्तान सीमापार दहशतवादाला अधिक प्रोत्साहन देईल. हीच गोष्ट भारतासाठी खरोखरच चिंताजनक असून पंतप्रधान मोदी यांचे कमकुवत नेतृत्व आता उघड झाल्याची टीका त्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.