Indian defense websites reportedly targeted in a cyber attack by Pakistan-based hackers, exposing vulnerabilities in critical national infrastructure.  sarkarnama
देश

Pakistan Cyber Attack on India : जित्याची खोड...! पाकिस्तानकडून आता भारताच्या डिफेन्स वेबसाइट्सवर सायबर हल्ला

Overview of the Cyber Attack by Pakistani Hackers : पहलगाम दहतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती कमी झालेल्या नाहीत. कधी अणुहल्ल्याची धमकी, तर कधी भारताला डिवचण्यासाठी वेगवेगळी विधान केली जात आहे.

Mayur Ratnaparkhe

cyber attack on Indian defense websites: पहलगाम दहतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरात नाचक्की सुरू असतानाही पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. एकीकडे सीमारेषेवर सतत शस्त्रसंधी उल्लंघन करत गोळीबार, घुसखोरीचे प्रयत्न, दहशतवाद्यांना पाठबळ देणे सुरू ठेवलेल्या पाकिस्तानने आता, भारताच्या डिफेन्स वेबसाइट्सवरही सायबर अ‍ॅटक केल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी विविध मार्गाने कडक पावलं उचलली आहेत. अनेक निर्बंध लादली आहेत, तरीही पाकिस्तानच्या कुरापती कमी झालेल्या नाहीत. कधी अणुहल्ल्याची धमकी, तर कधी भारताला डिवचण्यासाठी वेगवेगळी विधान केली जात आहे. त्यात आता पाकिस्तानी हॅकर्सकडून भारतीय संरक्षण दलाच्या महत्त्वपूर्ण वेवसाइट्सही हॅक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे उघड झाले आहे.

पाकिस्तानी हॅकर्सनी या वेबसाइट्स हॅक केल्याने भारताच्या संरक्षण दलाशी निगडीत गोपनीय माहिती लीक झाल्याचीही शक्यता वर्तवली गेली आहे. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान सायबर फोर्स नावाच्या एका एक्स हॅण्डलने मिलिट्री इंजिनिअर सर्व्हिसेस(MES) आणि मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँण्ड अँनालिसचा डेटा चोरला आहे. या सायबर हल्ल्यात संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्ससह गोपनीय माहिती लीक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय, या गटाने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर्मड व्हेईकल कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील युनिटची अधिकृत वेबसाइट बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तीनी ध्वज आणि एआय वापरून ही वेबसाइट बिघडवण्यात आली. 

भारतीय लष्कराने सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून आर्मड व्हेईकल निगम लिमिटेडची वेबसाइट सध्या ऑफलाइन करण्यात आली आहे. जेणेकरून वेबसाइटची कसून तपासणी करता येईल आणि या सायबर हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करता येईल. तसेच वेबसाइटची सुरक्षितता राखली जाईल याची खात्री केली जाईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT