Milind Deora Criticizes Uddhav Thackeray : ‘पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा उद्धव ठाकरे..’ ; मिलिंद देवरांनी लगावला टोला!

Pahalgam terrorist attack highlights political tensions : मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस ठाकरे गटाच्या खासदारांच्या अनुपस्थितीवरूनही टीका केली आहे.
Milind Deora addressing the media while criticizing Uddhav Thackeray over the Pahalgam terror attack and political accountability.
Milind Deora addressing the media while criticizing Uddhav Thackeray over the Pahalgam terror attack and political accountability. sarkarnama
Published on
Updated on

Milind Deora's Reaction to Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये देशभरातील पर्यटकांवर दहशवताद्यांनी केल्यानंतर, आता याचे सर्वत्र पडसाद उमटताना दिसत आहेत. देशभरातून या घटनेवर प्रचंड संताप व्यक्त होत आहे, तर भारत सरकारनेही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हालचालींना वेग दिलेला आहे. दरम्यान, या मुद्य्यावरून देशात आणि महाराष्ट्रात राजकारणही तापताना दिसत आहे. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

एका वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार मिलिंद देवरा यांनी सांगितले की, ''पहलगाममध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी आपण बघितलं की, अनेक राज्यातील नागरिक तेथे अडकले होते. तेव्हा अनेक राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नागरिकांना लवकरात लवकर तेथून परत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रतही ज्याप्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ पुढाकार घेत जम्मू-काश्मिमध्ये अडकलेल्या नागरिकांना आश्वासन दिलं की, मी तुम्हाला लवकरात लवकर महाराष्ट्रात आणेन आणि त्यांनी लवकरात लवकर ते आश्वासन पूर्णही केलं.''

Milind Deora addressing the media while criticizing Uddhav Thackeray over the Pahalgam terror attack and political accountability.
Pakistani MP Sher Afzal Marwat - Video : ‘’मोदी मेरे खाला का बेटा है, जो मेरे कहने पै…’’ ; पाकिस्तानी खासदारालाही आहे मोदींची ‘गारंटी’?

तर ''दुसरीकडे त्यावेळी ठाकरे कुटुंब युरोपमध्ये सुट्टी घालवत होतं. युरोपातून केवळ सोशल मीडिया व विशेषकरून ट्वीटरच्या माध्यमातून ट्वीत करत होते. त्यानंतर तत्काळ जेव्हा केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली, अतिशय महत्त्वपूर्ण व तातडीने त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या सर्वपक्षीय बैठकीतही ठाकरे गटाचा एकही खासदार सहभागी झाला नाही.'' असं म्हणत मिलिंद देवरा यांनी टीका केली.

Milind Deora addressing the media while criticizing Uddhav Thackeray over the Pahalgam terror attack and political accountability.
India action Pakistan : भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका; आता आयात-निर्यातच पूर्णपणे थांबवली!

तसेच, यानंतर लगेचच १ मे रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगर दिवस होता. त्या दिवशी जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हुतात्मा चौकात जाऊन हुतात्मांना अभिवादन करतो, त्यावेळी त्यांनी साधं ट्वीटही केलं नाही. 'तर हे स्वाभाविकच आहे की, आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या जनतेला या गोष्टीवर संपूर्ण विश्वास आहे की, जर कुणी नेता कार्यकर्त्याच्या रूपात काम करत असेल आणि बाळासाहेबांच्या विचारधारेस आणि कार्यास पुढे नेत असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे एकनाथ शिंदे.' असं देवरांनी सांगितलं.

Milind Deora addressing the media while criticizing Uddhav Thackeray over the Pahalgam terror attack and political accountability.
India Attack Possibility : ‘’भारत कधीही हल्ला करू शकतो, सैन्य अलर्टवर; खुद्द पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनाच धडकी!

याशिवाय 'मी यासाठी ट्वीट केलं की, ही जी टुरिस्ट पॉलिसी आहे. म्हणजे जे लोक पर्यटक म्हणून मुंबईत, महाराष्ट्रात येतात. भारतात येतात बाकी काळा युरोपात राहतात हे जे  पार्ट टाईम, लक्झरी पॉलिटिक्स आहे ते महाराष्ट्रात चालणार नाही. मोदींनी केंद्रात राष्ट्रीयस्तरावर ते राजकारण संपवलं आणि महाराष्ट्रातही लवकरच हे राजकारण संपणार आहे.' असं म्हणत खासदार मिलिंद देवरा यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com