Scene from Sindh, Pakistan where violent mobs opened fire and set the home of the interior minister ablaze during widespread unrest.  sarkarnama
देश

Pakistan violence : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात उफाळला हिंसाचार; जमावाकडून गोळीबार, गृहमंत्र्यांचं घरही पेटवलं!

Violence erupts in Sindh : जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण? , या हिंसाचाराचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Mayur Ratnaparkhe

Violence Erupts in Pakistan's Sindh Province : भारतासोबत सैन्य संघर्षात सपाटून मार खाल्ल्यानंतर आता पाकिस्तानचा अंतर्गत कलह देखील पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. बलुचिस्तानमधील लोक पाकिस्तानचा उघडपणे विरोध करत आहेत. या दरम्यान आता पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जबरदस्त हिंसाचार उफाळल्याचे समोर आले आहे.

एवढंच नाहीतर या ठिकाणी नियंत्रणाबाहेर गेलेल्या आंदोलकांनी गृहमंत्र्यांच्या घरावरही हल्ला केला आहे. याशिवाय, या लोकांनी बेधडकपणे गोळीबार करत, जाळपोळही केली आहे. या हिंसक आंदोलनाचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हारल होत आहे. ज्यामध्ये सिंध प्रातांचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचे घर पेटलेलं दिसत आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार सिंध प्रांतातील नौशेहरो फिरोज जिल्ह्यात मंगळवारी पोलीस आणि एका संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि सहा पोलीस आणि सहा आंदोलकही जखमी झाले. मात्र दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळले व हिंसक झाले. यानंतर संतप्त व अनियंत्रित आंदोलकांच्या निशाण्यावर सिंध प्रांताच्या गृहमंत्र्याचे घर आले, जे पेटवण्यात आले व या ठिकाणी लुटमारही केली गेली.

सिंध प्रांतात भडकलेल्या हिंसाचारास पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारची एक योजना कारणीभूत आहे. ज्यामध्ये सिंधू नदीवर कालवे बनवण्याची सरकारची योजना आहे. पाकिस्तान सरकार सिंधू नदीवर सहा कालवे बनवून चोलिस्तान वाळवंटात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याची योजना आखत आहे. मात्र सिंध प्रांतातील लोक आणि तेथील राज्य सरकार  या निर्णयास विरोध करत आहेत.

सिंध प्रांतामधील लोकांचे म्हणणे आहे की, सरकार त्यांची जमीन व पाणी हिसकावून घेत आहे. जेव्हा आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर धरणे आंदोलन करण्याचा प्रय़त्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांनी रोखले. यानंतर मग संघर्ष उफाळला व संतप्त आंदोलकांनी मग सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी या आंदोलकांनी काही ट्रक लुटले व जाळपोळही केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT