Pahalgam Terror Attack Update : जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये पाकिस्तानातील लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असणाऱ्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळीबार करून ठार केले. शिवाय या हल्ल्यात अनेकजण जखमीही झाले आहेत. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिवाय, जगभरातून या हल्ल्याचा निषेध नोंदवला जात आहे आणि पाकिस्तानवरही टीका सुरू आहे.
दरम्यान या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची भारताने पूर्ण तयारी केली असून, बुधवारी पंतप्रधान मोदींनी सीसीएसची बैठक घेत पाच मोठे निर्णय घेत पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर भेदरलेल्या पाकिस्तानाने आज(गुरुवार) भारतविरोधी काही वेगळे निर्णय घेत, प्रत्युत्तर देण्याचा केवीलवाना प्रयत्न करून दाखवला.
पाकिस्तानकडून घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये भारतासोबत व्यापर बंदी, भारतीय राजदूतांना ३० एप्रिल पर्यंत भारतात परतण्याचे आदेश आणि पाकिस्तानच्या बाजूची वाघा बॉर्डर बंद यांचा समावेश आहे. याशिवाय पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना मायदेशी जाण्यास चार दिवसांची मूदत दिली गेली आहे. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी हवाई हद्द बंद केली आहे. तसेच, भारत आणि पाकिस्तानातील सर्व द्विपक्षीय करार स्थगित केले आहेत. शिमला करार रद्द करण्याची धमकीही दिली आहे.
खरंतर भारताने याआधीच पाकिस्तानमधील भारतीय उच्चआयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांना परतण्याच्या सूचना केलेल्या होत्या, त्यामुळे पाकिस्तानने आज घेतलेल्या या निर्णयास फारसे काही महत्त्व उरले नव्हते.
शिवाय, भारताने अटारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिंधू जल करारास स्थगिती देऊन भारताने पाकिस्तानची पूर्णपणे कोंडी केलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून आता स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी केवीलवाणी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यात आधीच कर्जबाजारी असलेल्या पाकिस्तानाने भारतासोबतचे व्यापारी संबंध बंद करून, स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतल्याचे बोलले जात आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.