Panama Cargo Ship Sinks : बंगालच्या उपसागरात पनामा ध्वजांकित मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे जहाज ओडिशातील पारादीप बंदरातून सुमारे 1,700 टन लोहखनिजाची पूड घेऊन निघाले होते.
जहाजावर 24 खलाशी असल्याची माहिती असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. 20 ऑगस्ट रोजी रात्री पारादीपहून निघालेल्या या जहाजाचा समुद्रात संपर्क तुटला. तर ओडिशाच्या किनाऱ्यापासून सुमारे 240 सागरी मैल अंतरावर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाने संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आहे. तटरक्षक दलाची ‘वरद’ आणि ‘अनमोल’ ही जहाजे बचावकार्यात सहभागी झाली असून, परिसरातील इतर जहाजांनाही मदतीसाठी सतर्क करण्यात आले आहे.
जहाजावरील 24 खलाशांपैकी 20 जण चिनी, दोन म्यानमारचे आणि एक बांगलादेशी नागरिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. एका खलाशाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, जहाज नेमके कोणत्या कारणामुळे बुडाले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या बेपत्ता खलाशांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.