Abhijeet Dipke FIR : मोठी बातमी: 'स्कूल ठीक करो' अभियानाला पहिला धक्का; गंभीर आरोप अन् अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

School Theek Karo Protest: औसा येथे जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत अनधिकृत प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्रीकरण करून ते सोशल मिडियावर व्हायरल केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
Abhijeet Dipke.jpg
Abhijeet Dipke.jpgSarkarnama
Published on
Updated on

FIR Filed News : 'स्कूल ठीक करो', या काॅक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या अभियानात औसा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची बदनामी केल्याप्रकरणी दिपके यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औसा जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत खासगी शाळेतील विद्यार्थी आणून बसवले, असा दावा अभिजीत दिपके यांनी केला होता.

आमच्या शाळेची बदनामी केली, परवानगी न घेता चित्रीकरण केले यासह इतर आरोप करत शाळेच्या वतीने पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली होती. यावरून औसा पोलीसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला. औसा येथे जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत अनधिकृत प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्रीकरण करून ते सोशल मिडियावर व्हायरल केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अभिजीत दिपके अजिंक्य शिंदे आणि अन्य चार ते पाच अनोखी व्यक्तीविरुद्ध कलम-488/2026 कलम-132,329(3),351(2), 356 (2), 3 (5) भारतीय न्याय संहीता 2023 प्रमाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांना दिपके सह इतर आरोपी शाळेत गेले होते.

विद्यार्थ्यांमध्ये बसून विविध प्रश्न विचारात त्यांनी शिक्षकांच्या शैक्षणिक आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच शाळेची परवानगी न घेता चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप आहे. शाळेतील विद्यार्थी असतानाही दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी आणून बसवले असल्याचे सांगत आरोपींनी शाळेची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Abhijeet Dipke.jpg
Abdul Sattar : 'सरकार, मुंबई अन् CM फडणवीसांचा 'वर्षा' बंगला आम्हाला...'; 'पॅचअप'साठी गेलेल्या शिवसेनेच्या सत्तारांसमोरच जरांगेंनी वात पेटवली

शिक्षकांकडे पाहून आरोपींनी अपशब्द वापरले, त्यांना निलंबित करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सय्यद शमशाद बानू खैरात अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड हे करीत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाअंतर्गत 20 ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्यातील औसा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट दिली. या अभियानातून सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा, शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेची पाहणी केली जात आहे. औसा येथील शाळेत दिपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी काही विद्यार्थी हे त्या शाळेतील नसून पीपल्स प्रायमरी स्कूल या खासगी शाळेतील विद्यार्थी असल्याचा दावा करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com