मुंबई : देशातील अग्रगण्य उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे शनिवारी निधन झाले. (Rahul Bajaj Passes away) ते ८३ वर्षांचे होते. गेल्या ५ दशकांमध्ये बजाज उद्योग समूहाला (Bajaj Group) नावारूपाला आणण्यात आणि 'बजाज ऑटो'ला दुचाकी- तीन चाकी वाहन क्षेत्रात सर्वोच्च कंपनी बनवण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले (राजीव आणि संजीव) आणि एक मुलगी (सुनैना केजरीवाल) असा परिवार आहे.
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी कोलकता येथे झाला होता. त्यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण आणि हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चे शिक्षण घेतले होते. शिक्षणानंतर ते १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात उभं करण्यात त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली. (Rahul Bajaj Passes away)
राहुल बजाज यांनी 'हमारा बजाज' अशा प्रसिद्ध टॅगलाईनच्या माध्यमातून अनेक सामान्यांसाठीचे स्वतःच्या दुचाकीचे स्वप्न पुर्ण केले. तर स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्यांनी तीन चाकीचे ही स्वप्न पुर्ण केले. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे २००१ साली राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते राज्यसभेवर खासदार देखील होते.
बजाज समूहाकडे बजाज ऑटोशिवाय बजाज फिन सर्व्हिसेस, बजाज फायनान्स अशा नामांकित कंपन्या आहेत. बजाज अॅटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज आहेत, तर बजाज फिन सर्व्हिसेसचे संजीव बजाज अशी दोन मुले आहेत. त्यांची मुलगी सुनयना हिचा विवाह मनीष केजरीवाल यांच्याशी झाला आहे.
गांधी घराण्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध :
दरम्यान राहुल बजाज यांचे नेहरु आणि गांधी घरण्याचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. राहुल बजाज ज्यांचं नातं थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंशी होतं. स्वतः बजाज यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितले होते की आपल्याला राहुल हे नाव पंडित नेहरुंनी दिले होते. पुढे पंडित नेहरुंच्या नंतर देखील बजाज यांचा गांधी घरण्याशी असलेला जिव्हाळा कायम राहिला. इतका की त्यांनी स्वतःच्या मुलांची नाव देखील राजीव आणि संजीव अशीच ठेवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.