अमरावती : अमरावतीचे राजकारण मागच्या महिनाभरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भोवती केंद्रीत झाले आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून पुतळा बसल्यानंतर महानगरपालिकेकडून त्यावर कारवाई करत पुतळा हटवला गेला. संबंधित पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र हा आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असल्याचे सांगत राणा दाम्पत्यांनी पुतळा बसवणारच, ही भूमिका कायम ठेवली आहे.
याच वादातून आणि संघर्षांतून मागच्या काही दिवसांपूर्वी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रविण आष्टिकरांवर शाईफेक केली. या प्रकरणात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह १० जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून मला यात जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केला होता. त्यानंतर नवनीत राणा (navneet rana) यांनीही आपलं मौन सोडलं असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.
आयुक्तांचा भेटण्यास नकार :
दरम्यान अधिवेशन अवधीतून वेळ काढून अमरावतीला आल्यानंतर नवनीत राणा यांनी आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी वेळ देण्यास नकार दिल्याचे समोर आले. त्यानंतर राणा चांगल्याच संतप्त झाल्या. त्या म्हणाल्या पक्ष म्हणून नाही तर स्थानिक खासदार म्हणून आयुक्तांना भेटण्यास निघाली होती. खासदार म्हणून मतदार संघातील अधिकाऱ्यांसमवेत असा काही प्रकार घडल्यास त्याची विचारपूस करणे हे माझे कर्तव्यच आहे. मात्र त्यांनी भेटण्यास नकार दिला.
मावळ्यांच्या मागे ठामं उभं राहणार :
ज्या पद्धतीने ही घटना घडली त्याचे समर्थन कधीही करणार नाही, पण आम्ही शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या मागे ठाम उभे राहणार असल्याचे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले. तसेच त्या म्हणाल्या जेव्हा एका आमदारावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मारहाण झाली तेव्हा त्यातील एकाही घटनेत ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही, मग आताच कसा हा गुन्हा दाखल झाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.