Parimal Nathwani with PM Narendra Modi Sarkarnama
देश

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत भाजपने गेम पलटवला; काँग्रेसचा धक्कादायक पराभव, आमदार फुटले

Parimal Nathwani, Jharkhand Election : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ही माहिती दिली. इंडिया आघाडीतील चार आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Rajanand More

NDA Victory : झारखंडमध्ये झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराचा दारूण पराभव केला आहे. तर दुसऱ्या जागेवर झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या निकालामुळे सत्ताधारी इंडिया आघाडीला जोरदार झटका बसला आहे.

झारखंडमध्ये दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. इंडिया आघाडीकडून जेएमएमचे बैद्यनाथ राम आणि काँग्रेसचे प्रणव झा तर परिमल नाथवानी हे अपक्ष उमेदवार होते. नाथवानी यांना भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने पाठिंबा दिला होता. निवडणुकीत राम आणि नाथवानी विजयी झाले आहेत. अटीतटीच्या लढतीत नाथवानी झा यांचा पराभव झाला आहे.

नेमकं काय घडलं?

निवडणुकीत एकूण ८१ आमदारांनी मतदान केले. दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीकडे आवश्यक ५६ मते होते. तर नाथवानी यांना चार मते कमी पडत होते. त्यामुळे आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, निवडणुकीचा निकाल फिरला. नाथवानी हे २८ मते मिळवत विजयी झाले. तर झा यांना केवळ २० मतांवर माधान मानावे लागले आहे. राम यांना ३० मते मिळाली.

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ही माहिती दिली. इंडिया आघाडीतील चार आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आघाडीची तीन ते चार मते बाद झाल्याचेही सांगितले जात आहे. अद्याप त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, निवडणुकीच्या निकालाने सत्ताधारी आघाडीला भाजपने जोरदार धक्का दिला आहे.

राज्यसभेच्या या निकालाचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवरही पडण्याची शक्यता आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. उमेदवार देण्यावरूनच आघाडीमध्ये वाद निर्माण झाला होता. आपल्याशी चर्चा न करता उमेदवार जाहीर केल्याची नाराजी झारखंड मुक्ती मोर्चाने उघडपणे व्यक्त केली होती. आता काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्याने आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत नाथवानी?

नाथवानी हे उद्योजक असून आतापर्यंत तीनवेळा राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. आजच्या विजयाने ते सलग चौथ्यांदा राज्यसभेत दाखल होणार आहेत. झारखंडमधून निवडून येण्याची त्यांची ही तिसरी वेळ आहे. तर एकदा ते आंध्र प्रदेशातून राज्यसभेत पोहोचले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT