Shiv Sena crisis : ठाकरेंच्या 6 खासदारांनी टाकलेल्या डावासमोर कोणतीच 'स्ट्रॅटेजी' चालेना; पहिलीच चाल फसली?

Eknath Shinde, Uddhav Thackeray News : एकीकडे ठाकरेंच्या चार खासदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांच्या स्टेट्‍सची जोरदार चर्चा सुरू होती.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena MP update : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला लोकसभेतील केवळ तीनच खासदार उपस्थित आहेत. सुमारे दीड तासापासून ही बैठक सुरू असून अन्य खासदारांनी ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. पक्षाचा व्हीप डावलत खासदारांनी एकप्रकारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

संसद भवनातील बैठकीला खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चौघेच हजर आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर या सहा जणांनी दांडी मारली. त्यामुळे आता ठाकरेंच्या पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईला सुरूवात करण्यात आल्याचे समजते.

बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना तातडीने नोटीस पाठवून खुलासा मागविला जाऊ शकतो. त्यासाठी त्यांना काही तासांचाच वेळ दिला जाईल. त्यांचा खुलासा न आल्यास लोकसभा अध्यक्षांना सहा खासदारांवर कारवाईसाठी पत्र दिले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष त्यावर काय निर्णय घेणार, यावर ठाकरेंच्या पक्षाची पुढील भूमिका ठरले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Shiv Sena UBT news : ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिल्लीतील बैठकीबाबत महत्वाची अपडेट; चार खासदारांची उपस्थिती, कुणाची दांडी?

दरम्यान, एकीकडे ठाकरेंच्या चार खासदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांच्या स्टेट्‍सची जोरदार चर्चा सुरू होती. एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि त्यावर 'भले भले गार केले गम्मतमध्ये' असे लिहिण्यात आले होते. एकप्रकारे त्यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे संकेत दिल्याचे मानले जाते.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Rajya Sabha Election : राज्यसभेची एकही निवडणूक न हरलेला नेता आघाडीचे आमदार फोडणार? 24 तासांत लागणार निकाल...

मीडियाशी बोलतानाही सामंत यांनी एकनाथ शिंदेंनी कोणतेही ऑपरेशन हाती घेतले की यशस्वी करतातच, असे सांगतिले. त्यामुळे आपण हे स्टेट्‍स ठेवल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, अद्याप बंड केलेल्या सहा खासदारांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. या खासदारांनी स्वतंत्र गट करून लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, अद्याप तसे पत्र समोर आलेले नाही. त्यामुळे ऑपरेशन टायगरचे गुढ वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com