gurupatvant singh pannu Sarkarnama
देश

Parliament Attack : आठ दिवसांपूर्वी दिली होती संसदेवर हल्ल्याची धमकी ? पन्नूच्या 'त्या' व्हिडिओची चर्चा

Parliament Attack : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने 6 डिसेंबर रोजी एका व्हिडिओच्या माध्यमातून 13 डिसेंबरला भारताच्या संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

Sachin Waghmare

Parliament Attack : संसदेचे (Parliament) हिवाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी दुपारी अघटित घडले. लोकसभेचे (Lok Sabha) सुरक्षाकवच भेदत तिघांनी थेट सभागृहात उडी घेतल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. या दोन तरुणांनी उड्या घेतल्याने धूरही पसरला. लोकसभेमध्ये दोन तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने 6 डिसेंबर रोजी एका व्हिडिओच्या माध्यमातून 13 डिसेंबरला भारताच्या संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. भारतीय यंत्रणांनी मला मारण्याचा कट रचला पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. आता 13 डिसेंबर किंवा त्याआधी संसदेवर हल्ला करून याचे उत्तर दिले जाईल, असे तो म्हणाला होता. त्यानंतर बुधवारी दुपारी संसदेत तीन अज्ञात व्यक्ती घुसल्याने भारताविरोधातील 'त्या' व्हिडिओची चर्चा जोरात सुरु आहे.

कोण आहे गुरपतवंत सिंग पन्नू ?

खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या ही गुरपतवंत सिंग पन्नू याची ओळख आहे. भारताविरोधातील वक्तव्य केल्याने तो चर्चेत आला आहे. त्याने 13 डिसेंबर 2001 ला संसदेवर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देणारा व्हिडिओ पन्नू याने ६ डिसेंबर 2023 रोजी शेअर केला होता.

संसदेचे अधिवेशन (Parliament session) सुरु असताना त्याने अशास्वरूपाचा व्हिडिओ शेअर केल्याने चर्चा सुरु झाली होती. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने पन्नूला भारतविरोधात विधाने करण्याचा अजेंडा दिला असल्याचे समजते. त्याला अफझल गुरुचे नाव घेत कारवाया सुरु ठेवण्यास सांगण्यात आल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यातच 13 डिसेंबर 2001 च्या संसद ह्ल्ल्यातील दोषी अफझल गुरुचे पोस्टर शेअर करीत 'दिल्ली बनेगा खालिस्तान' असा शीर्षक असलेला व्हिडीओ गुरपतवंत सिंग पन्नू याने शेअर केला होता. दुसरीकडे या पूर्वीचं पन्नूने असाच व्हिडिओ शेअर करीत 19 नोव्हेंबर 2023 ला एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू नका, अन्यथा तुमच्या जीवाला धोका असल्याची धमकी दिली होती. त्यामुळे आता पुन्हा तो चर्चेत आला आहे.

गुरपतवंत सिंग पन्नूचा ६ डिसेंबर 2023 रोजी शेअर केलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणेने सतर्क होऊन याबाबत कारवाई करण्याची गरज होती.

(Edited by Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT