Sessions of Parliament : पाच राज्यांतील निवडणूक निकालाचा संसद अधिवेशनावर जाणवणार परिणाम; विरोधकांची घेरण्याची तयारी

Effect of election results in five states on the Parliament session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष आक्रमक होत सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.
Narendra Modi, Sonia Gandhi
Narendra Modi, Sonia GandhiSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. या निकालाचा परिणाम चार डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर हाेणार आहे. या अधिवेशनात लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपप्रकरणी कनिष्ठ सभागृहाच्या नैतिकता पालन समितीने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahva Moitra) यांची चौकशी केली होती. त्यामुळे खासदार मोईत्रा यांच्या चौकशीच्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजणार आहे. त्यासोबतच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष आक्रमक होत सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.

Narendra Modi, Sonia Gandhi
Shivsena-Bjp Alliance : भाजपसोबत पुन्हा युती करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न; भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पाचपैकी तीन राज्यांत भाजप काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे पाच राज्यांच्या निकालाचा परिणाम होणार आहे. त्यासोबतच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर(Narendra Tomar) यांचा मुलगा देवेंद्र तोमर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे विरोधी पक्ष केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात. त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या संसदेच्या नैतिकता समितीने कारवाई करण्याची शिफारस केली आहे. त्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय घेणारे आहेत. त्यामुळे या कारवाईनंतर विरोधी पक्ष या मुद्द्यावरही हंगामा करू शकतात. बसपा खासदार दानिश अली यांनी भाजप सदस्य रमेश बिधुरी यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने निलंबनाची मागणी केली आहे.

Narendra Modi, Sonia Gandhi
NCP Crisis News : 'अजित पवारांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही'; शरद पवार गटाच्या वकिलांचा मोठा दावा

महिला कुस्तीपटूच्या आरोपानंतर भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना चौकशीनंतर क्लीन चिट देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या प्रकारावरून विरोधक गदारोळ करण्याची शक्यता आहे. त्यासोबाबतच संसदेच्या दोन्ही सभागृहात या संशोधनासंबंधित तीन विधेयक पारित केली जाण्याची शक्यता आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Narendra Modi, Sonia Gandhi
Mahua Moitra News : अडचणीत सापडलेल्या महुआ मोईत्रांवर तृणमूल काँग्रेसने सोपवली 'ही' मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com