Sushil Kumar Shinde, PM Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi : सुशीलकुमार शिंदेंचे नाव घेत मोदींनी काँग्रेसला घेरलं; म्हणाले, उनको भी मरवा दिया…

Rajanand More

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. संविधान तसेच एससी, एसटी, ओबीसीच्या मुद्यांवरून त्यांनी काँग्रेसला घेरलं. काँग्रेस हा संविधानाचा सर्वात मोठा विरोधक असल्याची टीका मोदींनी केली.

मल्लिकार्जून खर्गे हे पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान उभे राहून बोलत होते. त्यावर बोलताना मोदी म्हणाले, खर्गेंनी पक्षाची खूप सेवा केली आहे. त्यामुळे त्यांनी पराभवाची जबाबदारी आपल्या अंगावरून घेऊन कुटुंबाला वाचवले. अशी स्थिती येते तेव्हा दलित, मागावर्गीयांना यातना झेलाव्या लागतात, हीच काँग्रेसची भूमिका असते.

लोकसभेत अध्यक्षांच्या निवडणुकीत काँग्रेसने एका दलिताचा बळी देण्यासाठी खेळ खेळला. पराभव होणार, हे त्यांना माहिती होते. पण तरीही त्यांना पुढे केले. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही हेच झाले. 2022 च्या निवडणुकीत त्यांनी उपराष्ट्रपतिपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांना पुढे केले. (उनको भी मरवा दिया) दलित मेले तर त्यांचे काही जात नाही, असे मोदींनी सांगितले.

2017 मध्येही पराभव निश्चित होता. काँग्रेसने मीरा कुमारींना पुढे केले. त्यांनाही पराभव पत्करावा लागला. काँग्रेसची एससी, एसटी, ओबीसी विरोधी मानसिकता आहे. त्यामुळे ते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा अपमान करत राहिले. पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपतींचाही त्यांनी अपमान केला, अशी खंतही मोदींनी यावेळी व्यक्त केली.

संविधानावरून हल्लाबोल

देशाच्या इतिहासातील ही पहिली निवडणूक होती, ज्यामध्ये संविधानाचे रक्षण हा मुद्दा होता, असे विरोधक म्हणतात. त्याचाही खरपूस समाचार मोदींनी घेतला. ते म्हणाले, 1977 ची निवडणूक तुम्ही विसरला का. रेडिओ, बोलणे, वृत्तपत्र बंद होते. त्यावेळी लोकांनी संविधानाच्या रक्षणासाठी मतदान केले होते. त्यावेळी देशातील विवेकबुध्दीने सत्ताधाऱ्यांना सत्तेतून बाहेर काढले होते. यावेळी देशवासियांनी संविधान रक्षणासाठी आमच्यावर विश्वास दाखवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT