Rajya Sabha Session Live : ‘यूपी’तील चेंगराचेंगरीनंतर महाराष्ट्रातील कायदा चर्चेत; सभापतींनीही घेतली दखल

Parliament Session 2024 Bhole Baba Satsang Maharashtra : हाथरसमध्ये मंगळवारी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी राज्यसभेत महाराष्ट्रातील अंधश्रध्दा कायद्याचा उल्लेख केला.
Rajya Sabha, Maharashtra
Rajya Sabha, MaharashtraSarkarnama

New Delhi : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायदा चर्चेत आला आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी बुधवारी राज्यसभेत या कायद्याचता उल्लेख केला. देशपातळीवरही असा कायदा करण्याची मागणी त्यांनी उचलून धरली.

राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती जगदीप धनकड यांनी हाथरस दुर्घटनेतील मृतांना श्रध्दांजली वाहिली. त्यांनी मल्लिकार्जून खर्गे यांनीही त्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी नकली बाबांचा उल्लेख केल्यानंतर सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला.

Rajya Sabha, Maharashtra
Hathras Stampede : 121 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला भोलेबाबा होता गुप्तहेर

काय म्हणाले खर्गे?

अनेक नकली बाबा पैशांसाठी लोकांना फसवत असून लोक अंधश्रध्देपायी त्यांच्याकडे जात असल्याचे खर्गे म्हणाले. अनेक नकली बाबा तुरुंगातही असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. काही खरे बाबा आहेत, त्यांना येऊद्या पण नकली बाबांविरोधात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कायद्याप्रमाणे देशपातळीवरही कायदा करावी, अशी मागणी खर्गे यांनी केली.

सभापती धनकड यांनीही खर्गे यांच्या मुद्यावरून सभागृह नेते जे. पी. नड्डा यांना याची दखल घेण्याची सुचना केली. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये असलेल्या जादूटोणा कायद्याचे नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 असे आहे.

Rajya Sabha, Maharashtra
Arvind Kejriwal News : केजरीवाल यांच्यावरील याचिकेचा फैसला 17 जुलैला ; दिल्ली उच्च न्यायालयाची सीबीआयला नोटीस

हे रोखण्यासाठी आहे महाराष्ट्रातील कायदा

-    तथाकथित चमत्कारांचा प्रचार-प्रसार करून लोकांना फसवणे, ठगवणे आणि त्यांच्यावर दहशत बसवणे.

-    अमानुष, अघोरी, अनिष्ट प्रथांचा अवलंब करणे आणि तसे करण्यास इतरांना प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे वा सक्ती करणे.

-    भूताचा वा अतिंद्रिय शक्तींचा कोप असल्याचा समज करून देऊन वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे. त्याऐवजी अमानुष, अनिष्ट, अघोरी कृत्य वा उपाय करायला प्रवृत्त करणे.

-    स्वतः अलौकिक शक्ती असल्याचा, कुणाचा अवतार असल्याचं असल्याचं भासवणे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com