Narendra Modi, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Parliament Session Live : राहुल गांधींच्या पहिल्याच भाषणाने हंगामा; मोदींनाही उभं राहावं लागलं...

Rahul Gandhi Narendra Modi Lok Sabha Session : विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर सोमवारी राहुल गांधी यांचे लोकसभेत पहिले भाषण झाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार टीका केली.

Rajanand More

New Delhi : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान जोरदार हंगामा झाला. राहुल यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उभे राहत नाराजी व्यक्त केली.

राहुल गांधी भाषणादरम्यान म्हणाले, इस्लाममध्ये म्हटले आहे की घाबरू नका, गुरू नानक यांनीही घाबरू नका सांगत सत्य आणि अहिंसेचे महत्व सांगितले आहे. येशू ख्रिस्त, भगवान बुध्द आणि भगवान महावीर हेही घाबरू नका, म्हणाले आहेत. हा देश अहिंसेचा आहे.

हिंदू धर्मातही सत्य, अहिंसेला महत्व असल्याचे सांगत राहुल यांनी जे स्वत:ला हिंदू समजतात ते (सत्ताधारी बाकांकडे पाहत) नेहमीच असत्य बोलतात, हिंसा करतात, असे विधान केले. त्यावरू सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. पंतप्रधान मोदींनी उभे राहत त्यावर नाराजी व्यक्त केली. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे हा खूप गंभीर विषय असल्याचे मोदी म्हणाले.

त्यावर राहुल गांधी यांनीही प्रत्युत्तर देताना नरेंद्र मोदी, भाजप म्हणजे सर्व हिंदू नाहीत, असे म्हटले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही पलटवार करताना राहुल यांनी माफी मागण्याची आग्रह धरला. हिंसेच्या भावनेला कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे आहे. त्यामुळे राहुल गांधींनी माफी मागायला हवी.  

राहुल गांधी यांच्या विधानावरून सत्ताधारी आणि विरोधातील सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी सदस्यांनी राहुल गांधींनी माफी मागण्याची मागणी सातत्याने केली. तर विरोधी बाकांवरील सदस्यांकडूनही राहुल गांधी यांची बाजू उचलून धरल्याने बराच वेळ मोठा गदारोळ सुरू होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT