Bansuri Swaraj Speech : सुषमा स्वराज यांच्या स्टाईलमध्ये दमदार भाषण करत बांसुरी विरोधकांवर बरसल्या!

Lok Sabha Session Live Parliament Sushma Swaraj : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत धन्यवाद प्रस्ताव मांडला. त्याला बांसुरी स्वराज यांनी अनुमोदन दिले.
Sushma Swaraj, Bansuri Swaraj
Sushma Swaraj, Bansuri SwarajSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेतील बहुतेक सदस्यांना सोमवारी भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची आठवण झाली असेल. आपल्या भाषणाने त्या सभागृह दणाणून सोडत होत्या. तसेच दमदार भाषण सोमवारी त्यांच्या कन्या खासदार बांसुरी स्वराज यांनी लोकसभेत केले.

बांसुरी स्वराज यांनी सुषमा स्वराज यांच्या बोलण्याच्या स्टाईलमध्येच जोरदार भाषण करत सरकारची प्रशंसा विरोधकांवर प्रहार केले. त्यांची शब्दफेक, हातवारे करण्याची पध्दत, हिंदीवर असलेले प्रभुत्व, विरोधकांकडे पाहण्याची, टीका करण्याची स्टाईल सुषमा स्वराज यांची आठवण करून देत होती.

Sushma Swaraj, Bansuri Swaraj
Parliament Session Live : शिवाजी महाराज, आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी खर्गेंनी राज्यसभा दणाणून सोडली...

राष्ट्रपतींच्या अभिभाषमावरील धन्यवाद प्रस्तावावर बांसुरी स्वराज यांचे भाषण झाले. त्या पहिल्यांदाच लोकसभेत निवडून आल्या आहेत. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी आपल्या आईप्रमाणेच संस्कृतमध्ये सदस्यत्वाची शपथ घेत जुन्या आठवणी ताज्या केल्या होत्या.

बांसुरी स्वराज यांनी लोकसभेत बोलण्यासाठी सुरूवात करताच काही क्षण सुषमा स्वराज यांची आठवण अनेक सदस्यांना झाली असेल. आईसारखेच हावभाव आणि हातवारे करत त्यांनी आपल्या सरकारवर स्तुतीसुमने उधळली तर विरोधकांना हल्लाबोल केला.

Sushma Swaraj, Bansuri Swaraj
Parliament Session Live : ओम बिर्ला संतापले; राहुल गांधींचा माईक बंद केल्याच्या मुद्द्यावरून खडसावले

भाषणापासून ते साडी नेसण्याच्या स्टाईलपर्यंत त्या आपल्या आईप्रमाणेच भासतात. त्याचे झलक लोकसभेत सोमवारी पाहायला मिळाली. देशात पहिल्यांदाच असे सरकार आले आहे, ज्या सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आहे, असे सांगत त्यांनी मोदी सरकारने मागील दहा वर्षात केलेल्या कामांचा पाढाच वाचला.

दरम्यान, लोकसभेत सोमवारी विरोधकांनी नीटच्या मुद्यावरून कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीटवर चर्चेसाठी एक दिवस द्यावी, अशी विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली. मात्र, त्यांनी नोटीस देण्याचे सांगत सभागृहाचे कामकाज सुरू ठेवले. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करत कामकाजावर बहिष्कार टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com