Lok Sabha heated argument : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. भाषणादरम्यान त्यांनी वंदे मातरम् गीताची पार्श्वभूमी सांगताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. ते म्हणाले. शाळांमध्ये आम्ही वंदे मातरम् म्हणायचो. प्रभात फेऱ्या निघायच्या. हिंदू-मुस्लिम सर्व एकत्रितपणे फिरत होते.
‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा’, हेही आम्ही गात होतो. आज त्याची आठवण येते. सत्तापक्षाच्या पितृ संघटनेने तो तिरंगा कधीही ५० वर्षात आपल्या कार्यालयावर फडकवला नाही, कधी राष्ट्रगीतही म्हटले नाही. आज तेच लोक वंदे मातरम् चे कौतुक करत आहेत, असे अरविंद सावंत म्हणतात विरोधी बाकांवर शेम-शेम असा आवाज आला.
सत्ताधारी बाकांवरून मात्र त्याचा विरोध झाला. सावंत यांचे भाषण ऐकणारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी त्यांच्यावर चांगलेच भडकले. त्याचवेळी सावंत यांच्या शेजारी बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे धावून आले. ‘ये खाली बस रे, बंद कर’ असे म्हणू लागले. त्यांच्यामागे बसलेले सावंत यांच्या पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनीही हातवारे करून खाली बसण्याचा इशारा केला.
प्रल्हाद जोशी यांनी सावंत यांच्या विधानावर संताप व्यक्त करत म्हटले की, खासगी इमारतींवर तिरंगा फडकावला जात नाही, एवढेही त्यांना माहिती नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जर अरविंद सावंत यांना ऐकले असते, त्यांच्या आत्म्याला खूप दु:ख झाले असते, हे त्यांना समजायला हवे, असा टिप्पणीही जोशी यांनी केली. त्यावर सावंत यांनी मी सत्य सांगत असल्याचे नमूद केले.
सावंत एवढ्यावरच थांबले नाहीत. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांच्या एकाही पुस्तकात वंदे मातरमचा उल्लेख नसल्याचे त्यांनी सांगितले. आजही राज्यसभेत एक नियम आहे. जयहिंद, वंदे मातरम् म्हणायचे नाही. आम्ही राज्यसभेच्या सभापतींना भेटलो होतो, त्यांनी तो नियम रद्द केलेला नाही, असे सावंत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.