Vande Mataram in Parliament : ‘वंदे मातरम्’वर अन्याय झाला, विश्वासघात झाला! PM मोदींकडून महात्मा गांधी, नेहरूंचे नाव घेत हल्लाबोल

PM Modi attacks Congress : वंदे मातरम् विरोधात मोहम्मद अली जीना यांनी १५ ऑक्टोबर १९३७ मध्ये नारा दिला. पंडित नेहरूंना आपले आसन डगमगताना दिसले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
PM Modi in Parliament
PM Modi in ParliamentSarkarnama
Published on
Updated on

Vande Mataram injustice statement : ‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज संसदेत चर्चेला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ही चर्चेला सुरूवात करण्यात आली. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंसह काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. हे भावगीत देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा मंत्र बनलेले असताना त्यावेळी त्यावर अन्याय झाला, विश्वासघात झाल्याची टीका पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधान म्हणाले, ‘वंदे मातरम्’ला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा देश गुलामीत होता. आणि जेव्हा १०० वर्षे झाली तेव्हा देशात आणीबाणी लादण्यात आली होती. वंदे मातरम् मध्ये स्वातंत्र्यलढ्याचा स्वर होता. या काळात भारतीयांना धैर्य मिळाले. त्यामुळे ते इंग्रजांसाठी आव्हान बनले होते. इंग्रजांनी बंगालची फाळणी करून लढ्याला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी त्यावर बंदी घातली.

वंदे मातरमसाठी महिला आणि लहान मुलांनीही लढा दिला. बंगालमधील मुलांच्या हिंमतीने देशाला हिमंत दिली होती. बंगालमधून निघालेला आवाज देशाचा आवाज बनला होता. देशातील अनेक ठिकाणी मुलांवर इंग्रजांनी अत्याचार केले. कोणत्याही भीतीशिवाय आपले वीर फाशीवर चढत होते. शेवटच्या श्वासापर्यंत वंदे मातरम् हाच त्यांचा जयघोष असायचा. हे वेगवेगळ्या भागात होत होते. त्यांची भाषा वेगवेगळी होती. पण एक भाषा, श्रेष्ठ भारत, त्यांचा मंत्र एकच होता, असे मोदी म्हणाले.

PM Modi in Parliament
Parliament Session Live : संसदेत मेधा कुलकर्णी यांनीच केली सरकारची पोलखोल; शिवाजी महाराजांच्या गडांसह शनिवारवाड्याचा उल्लेख करत मांडला महत्वाचा मुद्दा...

महात्मा गांधी यांना १९०५ मध्ये वंदे मातरम् राष्ट्रगीत वाटत होते. त्यांनी याबाबत लिहिले होते. वंदे मातरम एवढे महान होते, त्याची भावना एवढी महान होती, मग त्यावर एवढा अन्याय का झाला? विश्वासघात का झाला? ती कोणता ताकद होती, ज्यांची इच्छा महात्मा गांधींच्या भावनांवरही भारी पडली. ज्या ताकदीने वंदे मातरमसारख्या पवित्र भावनेलाही वादात ओढले, असे मोदी यांनी नमूद केले.

वंदे मातरम् विरोधात मोहम्मद अली जीना यांनी १५ ऑक्टोबर १९३७ मध्ये नारा दिला. पंडित नेहरूंना आपले आसन डगमगताना दिसले. नेहरूंनी त्यांना करारा जवाब देण्याऐवजी वंदे मातरमची पडताळणी सुरू केली. जीनाच्या विरोधानंतरही २० ऑक्टोबरला नेहरूंना नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहून जीनाच्या भावनेशी संमती दाखवत म्हटले वंदे मातरमची आनंदमठशी संबंधित पार्श्वभूमी मुस्लिमांना इरिटेट करेल, असे पत्रात लिहिल्याचे मोदींनी सांगितले.

PM Modi in Parliament
Maharashtra Assembly Session : ठाकरे देणार भास्कर जाधवांना धक्का? अधिवेशन सुरू होण्याआधीच सामंतांकडून गौप्यस्फोट

मी वंदे मातरम गीताचे बॅकराऊंड वाचले आहे. मला वाटते यामुळे मुस्लिम भडकतील, असे नेहरूंनी पत्रात लिहिले होते. त्यावेळी काँग्रेसने म्हटले की, २६ ऑक्टोबरच्या बंगालमधील बैठकीत वंदे मातरमची समिक्षा केली जाईल. याने संपूर्ण देश हैराण झाला होता. संपूर्ण देशात देशभक्तांनी या प्रस्तावाविरोधात प्रभातफेऱ्या निघाल्या. पण देशाचे दुर्भाग्य म्हणजे काँग्रेसने २६ ऑक्टोबरला वंदे मातरम वर समोझाता केला. त्याचे तुकडे करण्यात आले. काँग्रेसने मुस्लिम लीगच्या पुढे गुडघे टेकले होते, अशी टीका मोदींनी केली. तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या दबावाखाली काँग्रेसने वंदे मातरम तोडण्यासाठी झुकले. त्यामुळे काँग्रेसला एक दिवस भारताच्या फाळणीसाठी झुकावे लागले. दुर्दैवाने काँग्रेसची धोरणे अजूनही तशीच आहेत, असेही मोदी म्हणाले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com