Rahul Gandhi, Nitin Gadkari Sarkarnama
देश

Parliament Session Live : गडकरींचे नाव घेत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा; काय घडलं लोकसभेत?

Lok Sabha Session Rahul Gandhi Narendra Modi Nitin Gadkari : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यावरून अनेकदा गोंधळही झाला.

Rajanand More

New Delhi : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या भाषणातील काही वक्तव्यांवर सत्ताधारी बाकांवरील अनेक सदस्यांनी वारंवार आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उभे राहत त्यावर आक्षेप घेतला.

राहुल यांनी भाषणात बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतून निवडणूक लढण्याची चाचपणी करत होते. पण सर्वेक्षणामध्ये ते पराभूत होतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे ते वाराणसीला गेले. तिथेही थोडक्यात वाचले. अयोध्येतील जनतेला घाबरवले, संपूर्ण देशाला यांनी घाबरवल्याची टीका राहुल यांनी केली.

सकाळी संसदेत आल्यानंतर राजनाथ सिंह यांनी मला हसून नमस्कार केला. पण आता मोदीजी आहेत तर खूप गंभीर आहेत. नमस्तेही करत नाही, मोदीजी तर पाहणार नाहीत ना, याची भीती आहे. हीच कहानी गडकरींचीही आहे. हेच खरं आहे. अयोध्येतील जनतेला तर सोडा पण हे तर भाजपच्या लोकांनाही घाबरवत असल्याचा हल्लाबोल राहुल यांनी केला.

राहुल यांच्या या विधानानंतर सत्ताधाऱ्यांनी त्याला जोरदार विरोध करण्यास सुरूवात केली. तर पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना उभे राहावे लागले. विरोधी पक्षनेत्याला गंभीरपणे ऐकायला हवे, असे मला लोकशाही आणि संविधानाने शिकवले आहे, असे यावेळी मोदी म्हणाले. मग विरोधी बाकांवरूनही जय संविधानचे नारे देण्यात आले.  

दरम्यान, राहुल गांधी यांच्या हिंदूंविषयीच्या वक्तव्यावरूनही मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यावर आक्षेप घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT