Sanjay Dina Patil
Sanjay Dina Patil Sarkarnama
देश

Sanjay Dina Patil: 18 व्या लोकसभेच्या पहिल्यावहिल्या अधिवेशनाला संजय दिना पाटलांचा लुक जुनाच

सरकारनामा ब्यूरो

मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांना पराभवाची धुळ चारणारे ठाकरेचे शिलेदार संजय दिना पाटील हे दुसऱ्यांदा दिल्लीच्या राजकारणात उतरले आहेत. 18 व्या लोकसभेच्या पहिल्यावहिल्या अधिवेशनाला त्यांनी हजेरी लावली.

विरोधी नेत्यांच्या आंदोलनात ते ठळकपणे दिसले. अनेक खासदारांनी अधिवेशनासाठी आकर्षक लुक ठेवला. त्यात संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) मात्र नेहमीच्या म्हणजे जीन्स, शर्ट अशा पेहरावात दिसले.

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. नरेंद्र मोदींनतर इतर खासदारांचा शपधविधी सुरु आहे. शपथविधीपूर्वी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर गांधी पुतळ्याजवळ विरोध आंदोलन सुरु केले आहे. नरेंद्र मोदी हे लोकशाही परंपरा नष्ट करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. संविधानाची प्रत हातात घेऊन काँग्रेस नेते खर्गे, सोनिया गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली.

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे. पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. मोदींनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकसभा खासदारांनी शपथ घेतली.

राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे भारतीय संविधानावर हल्ला करत आहेत. आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही त्याच ठिकाणी आंदोलन करत आहोत, जिथे संसद परिसरात महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होता,"

आम्ही संविधानाच्या रक्षणात उभे आहोत. संसद परिसरातील महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांचे पुतळे हटवण्यात आले. याचाही विरोध विरोधी पक्षांनी केला. काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, आमचा हा विरोध नरेंद्र मोदींना संविधानानुसार काम करण्याचे आवाहन करण्यासाठी आहे, असे खर्गे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT