Nirmala Sitharaman Sarkarnama
देश

Economic Survey 2024 : सगळं काही एकदम ओके! बजेटआधी सरकारने दाखवले ‘अच्छे दिन’

Parliament Session Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमण यांच्याकडून मंगळवारी लोकसभेत बजेट सादर केले जाणार आहे. त्याआधी त्यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल मांडला.

Rajanand More

New Delhi : देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याची हमी देणारा आर्थिक पाहणी अहवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी लोकसभेत मांडला. त्या मंगळवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिले बजेट सादर करणार आहेत. त्याआधी आर्थिक पाहणी अहवालातून त्यांनी देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीचे चित्र मांडले.

आर्थिक पाहणी अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षामध्ये देशाचा जीडीपी 6.5 ते 7 टक्के राहील, असा अंदाज आहे. तर महागाईही आटोक्यात राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. महागाई दर 4.5 टक्क्यांच्या जवळपास राहील. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये हा दर 4.1 टक्के राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोरोना, तसेच जगभरातील अनिश्चित आर्थिक स्थितीनंतरही देशातील महागाई नियंत्रित ठेवण्यात यश आले आहे. आंतरराष्ट्रीय युध्द आणि खराब हवामानामुळे खाद्य वस्तूंचे दर वाढल होते. पण त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

2021 ते 2024 पर्यंत अर्थसंकल्पातील तूट कमी करण्यात आली आहे. कर वगळून सरकारचे उत्पन्न एकूण महसूलाच्या 14.5 टक्के असून करातून आलेला महसूल वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. रोजगाराबाबतही अहवालात सकारात्मक बदल दाखवण्यात आले आहे. बेरोजगारीचा दर कमी होत असल्याचे म्हटले आहे.  

जागतिक आव्हानांमुळे निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची भीती सरकारने अहवालात व्यक्त केली आहे. त्यासाठी सरकार सतर्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यांची क्षमता वाढविण्यावर अधिक भर देण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिक्षण आणि रोजगारात संतूलन आणि 2030 पर्यंत भारताला ग्लोबल ड्रोन हब बनविण्यावरही अहवालात जोर देण्यात आला आहे.

दरम्यान, आर्थिक पाहणी अहवालातून अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आल्याने मंगळवारी सादर होणाऱ्या बजेटमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये शेतकरी, युवक आणि छोट्या उद्योगांसाठी काही सकारात्मक पावले उचलली जातील, अशी चर्चा आहे. तसेच नोकरदारांनाही दिलासा मिळू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT