Sansad TV  Sarkarnama
देश

Parliament Session Update : मला पाहा, फुले वाहा! संसद टीव्हीचा कॅमेरा 73 वेळा मोदींवर तर राहुल गांधींवर फक्त…

Congress PM Narendra Modi Rahul Gandhi Sansad TV : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाचे थेट प्रसारण संसद टीव्हीवरून करण्यात आले. त्यावरून काँग्रेस नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे.

Rajanand More

New Delhi : 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी दोन्ही सभागृहांचे सदस्यांना संबोधित केले. या अभिभाषणाचे थेट प्रसारण संसद टीव्हीवरून करण्यात आले. मात्र, या प्रसारणावरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून संसद टीव्हीच्या पक्षपाती भूमिकेवर बोट ठेवले आहे.

महाराष्ट्र काँग्रेससह ज्येष्ठ नेते जयराम रमेश तसेच काही नेत्यांनी संसद टीव्हीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अभिभाषणादरम्यान संसद टीव्हीचा कॅमेरा फक्त मोदींवर होता का, असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसने उपस्थित केला आहे. संसद टेलिव्हिजन, ‘मला पहा, फुले वाहा’ यासाठी नाही! असा खोचक टोला काँग्रेस ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये लगावला आहे.   

मोदींकडे 73 वेळा कॅमेरा

काँग्रेसने केलेल्या ट्विटनुसार, 51 मिनिटांच्या अभिभाषणात 73 वेळा कॅमेराची नजर मोदींवर होती. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे फक्त सहावेळा कॅमेरा फिरला. केंद्र सरकारवर म्हणजे सत्ताधारी बाकांवर बसलल्या सदस्यांना संसद टीव्हीवर 108 वेळा दाखवण्यात आले. तर विरोधी पक्षांवर केवळ 18 वेळा कॅमेराची नजर गेली.

संसद टीव्ही कॅमेराजीवींसाठी नाही, ना संसद देखील. संसद टेलिव्हिजन जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी काय करतात, यासाठी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. जयराम रमेश यांनीही टीका केली आहे. संसद टीव्ही सभागृहातील कामकाज दाखवण्यासाठी असून कॅमेराजीवीची आत्ममुग्धतेसाठी नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात नवीन सरकारच्या कामाचा रोडमॅप मांडला. तसेच त्यांनी मागील दहा वर्षात सरकारने केलेल्या कामाचे तोंडभरून कौतुकही केले. आगामी बजेटमध्ये काही ऐतिहासिक निर्णय घेतले जातील, असे संकेतही त्यांनी अभिभाषणात दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT