Parliament Session Live : देश संविधान से चलेगा या राजा के डंडे से! नव्या वादाला फोडणी...नेमकं काय घडलं?

Constitution of India Sengol R K Chaudhary : समाजवादी पक्षाचे खासदार आर. के. चौधरी यांनी संसदेतून संगोल हटवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Sengol Row
Sengol RowSarkarnama

New Delhi : नव्या संसद भवनात स्थापित करण्यात आलेल्या सेंगोलवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित केल्यानंतर दिल्लीत हा वाद चांगलाच वाढला आहे. समाजवादी पक्षाचे खासदार आर. के. चौधरी त्याला कारणीभूत ठरले आहेत.

खासदार चौधरी यांनी संसदेतून सेंगोल हटवून त्याजागी संविधान ठेवण्याची मागणी केली आहे. भाजपच्या सरकारने संसद भवनात अध्यक्ष बसतात, त्याठिकाणी सेंगोल स्थापित केला आहे. सेंगोलचा हिंदीतील अर्थ राजदंड असा आहे. म्हणजेच राजाची छडी (राजा का डंडा). आता देश संविधानाने चालणार की, राजाच्या छडीने, असा सवाल चौधरींनी उपस्थित केला.

Sengol Row
Parliament Session Live : राष्ट्रपतींनी विरोधकांचे कान उपटले; अभिभाषणादरम्यान घोषणाबाजी...

लोकशाही वाचवायची असेल तर संसद भवनातून सेंगोल हटवायला हवा, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. यावर बोलताना सपाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांनीही त्यांचे समर्थन केले. सेंगोल स्थापित केला तेव्हा पंतप्रधानांनी प्रमाण केला होता. पण शपथ घेताना ते विसरले. याची आठवण करून देण्यासाठी आमच्या खासदारांनी पत्र लिहिले.

भाजपकडून टीकास्त्र

भाजपच्या नेत्यांनी चौधरींच्या मागणीवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय मंत्री जयंत चौधरींनी म्हटले आहे की, हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. प्रकाशझोतात येण्यासाठी हे लोक असे बोलतात. संविधानाला आम्ही सगळेच मानतो. समाजवादी पक्षाने एकट्याने संविधानाचा ठेका घेतलेला नाही. केंद्रीय मंत्री चिराग पावसा यांनीही निशाणा साधला. जनतेने त्यांना काम करण्यासाठी संसदेत पाठवले आहे. पण इथे हे लोक केवळ वाद निर्माण करत आहेत. हे लोक केवळ विभाजनाचे राजकारण करत आहेत.

Sengol Row
Parliament Session Live : केंद्राच्या बजेटमध्ये काय असणार? राष्ट्रपतींनी दिले मोठे संकेत

काय आहे सेंगोल?

सेंगोल हा शब्द सेम्मई या तमिळ शब्दापासून आला आहे. सेंगोल हा एक राजदंड असतो. चांदीच्या सेंगोलवर सोन्याची मुलामा असतो. त्यावर भगवान शंकराचे वाहन नंदी महाराज आहेत. संसदेत स्थापित सेंगोल पाच फूट लांब आहे. काही विशिष्ट वेळीच सेंगोल संसदेतून बाहेर आणला जातो. त्याचे महत्व जनतेला कळावे, हा त्यामागचा उद्देश आहे. 1947 नंतर पहिल्यांदाच सेंगोलला संसदेत स्थापित करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com