Jagdeep Dhankhar, Sagarika Ghose Sarkarnama
देश

Parliament Session Update : तुम्ही यासाठी संसदेत आलाय का? सागरिका घोष यांच्यावर सभापती भडकले

Rajanand More

New Delhi : संसदेच्या दोन्ही सभागृहात शुक्रवारी पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच गाजला. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीटवर चर्चा करण्याची मागणी केली. पण अध्यक्षांनी मागणी फेटाळल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज एक जुलैपर्यंत स्थगित करण्यात आले.

राज्यसभेतही विरोधकांनी नीटचा मुद्दा लावून धर सभापतींच्या आसनासमोरील रिकाम्या जागेत धाव घेत नारे दिले. यावेळी सभापती जगदीप धनकड यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना चांगलेच खडसावले. पहिल्यांदाच संसदेच पोहचलेल्या खासदार सागरिका घोष यांना तुम्ही यासाठी संसदेत आला आहात, अशा शब्दांत सुनावले.

धनकड यांनी खासदार साकेत गोखले आणि डेरेक ओब्रायन यांच् नाव घेत त्यांनाही सुनावले. पण त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाजही दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. बारा वाजता कामकाजाला सुरूवात झाल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरू आहे. या गोंधळातच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सत्ताधारी सदस्यांची भाषणे सुरू आहेत.

कधी उठायचे, कधी बसायचे?

लोकसभेचे कामकाज दुपारी बारा वाजता पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी नीटचा मुद्दा लावून धरला. यावेळी उभे राहिलेल्या काही सदस्यांना ओम बिर्ला यांनी खाली बसण्याची विनंती केली. सदस्य ऐकत नसल्याचे पाहून बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संबंधित सदस्यांना कधी उठायचे, कधी बसायचे, अशी सुचना देण्यास सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT