Parliament Session Live : राहुल गांधींचा ‘तो’ मुद्दा अन् विरोधकांचा गोंधळ; संसदेचे कामकाज करावे लागले स्थगित

Delhi Rain Parliament Session 2024 Modi Government INDIA Alliance : नीट परीक्षेचा मुद्दा राहुल गांधी यांनी सभागृहात उपस्थित केला. हा मुद्दा विरोधकांनीही उचलून धरला होता.
Lok Sabha Session
Lok Sabha SessionSarkarnama

New Delhi : संसदेच्या अधिवेशनात शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत नीट परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यावर चर्चा करण्याची मागणी केली.

संसदेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी चर्चेसाठी हा पहिलाच मुद्दा उपस्थित केला. मात्र, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांनी उपस्थित केलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्यास नकार दिला.

Lok Sabha Session
Narendra Modi : "जिथे-जिथे मोदींनी हात लावला, तिथे अशुभ घडलं"; कोणी केली घणाघाती टीका?

संसदीय मर्यादांचे पालन करावे, अशी विनंती ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना तुम्ही सर्व मुद्यांवर सविस्तर बोलू शकता, असे बिर्ला यांनी सांगूनही विरोधकांनी आपले म्हणणे लावून धरले.

राहुल गांधी यांच्या पाठोपाठ इतर सदस्यही उठून उभे राहिले आणि त्यांनी नीटवर चर्चा करण्याची मागणी केली. विरोधक नारेबाजी करत असताना अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज सुरूच ठेवले. मात्र, त्यानंतर विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित केले.

Lok Sabha Session
Parliament Session Live : दिल्लीत पावसाचा धुमाकूळ; संसदेतही धडकणार सरकारविरोधी वादळ

सरकार आणि विरोधकांच्या बाजूने आम्ही नीटच्या विद्यार्थ्यांना एकत्रितपणे संदेश देऊ इच्छितो. विद्यार्थ्यांचा आदर करून आपण नीटवर चर्चा करावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली होती. पण त्यावर चर्चा करण्यास अध्यक्षांनी नकार दिला.

राज्यसभेतही गोंधळाने सुरूवात

राज्यसभेतही विरोधकांनी नीटचा मुद्दा उपस्थित करून चर्चेची मागणी केली. काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनीही त्यावर चर्चा करण्याची विनंती केली. पण राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी चर्चा करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू ठेवले. तर दुसरीकडे विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन नारे देत राहिले. त्यानंतर मात्र, धनकड यांनी सभागृहाचे कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com