Amit Shah Sarkarnama
देश

Parliament Winter Session : घुसखोरीच्या घटनेनंतर अमित शाह पहिल्यांदाच लोकसभेत आले पण...

LokSabha Security Breach : संसदेतून 143 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे...

Rajanand More

Amit Shah News : लोकसभेत घुसखोरीची घटना घडल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेसंदर्भात दोन्ही सभागृहात निवेदन करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, सभागृहांमध्ये गोंधळ घातल्याच्या कारणास्तव आतापर्यंत 143 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर बुधवारी अमित शाह पहिल्यांदाच लोकसभेत आले आहेत.

लोकसभेमध्ये (Lok Sabha) 13 डिसेंबर रोजी दोन तरुणांनी घुसखोरी केल्याने संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षेतील गंभीर त्रुटी समोर आल्याने विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवले आहे. घटनेनंतर दररोज लोकसभा आणि राज्यसभेत (Rajya Sabha) विरोधकांकडून अमित शाह (Amit Shah) यांनी निवेदन करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी फलक झळकावले जात आहेत, घोषणाबाजी केली जात आहे.

घटनेला सात दिवस होऊनही अमित शाह संसदेत न आल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले होते. दोन्ही सभागृहातील 143 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत आता केवळ विरोधी बाकांवर 45 खासदार उरले आहेत. त्यातही सर्वाधिक खासदार हे वायएसआर काँग्रेस आणि बीजेडीचे आहेत. यापार्श्वभूमीवर अमित शाह हे आज लोकसभेत दाखल झाले.   

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

शाह हे मागील काही दिवसांत संसदेत सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनावर भाष्य करणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली होती. मात्र, त्यांनी भारतीय न्यायिक संहिता विधेयक, भारतीय पुरावा विधेयक आणि भारतीय नागरी संरक्षण संहिता विधेयक ही तीन विधेयकांवर चर्चा केली. हे तीनही कायदे लोकसभेत मंजूरही करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीनही कायदे मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर लोकसभेचे पुढील कामकाज सुरू झाले.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT