Parliament Winter Session : सर्व रिक्त पदांची भरती ‘मिशन मोड’वर; केंद्र सरकारने दिली खुषखबर

Employment : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्याकडून लोकसभेत माहिती...
PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha News : बेरोजगारीच्या मुद्यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून घेरले जात असताना केंद्र सरकारने खुशखबर दिली आहे. विविध विभागांमध्ये सर्व रिक्त पदे मिशन मोडवर भरली जात असल्याची माहिती बुधवारी लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून भरती प्रक्रियेला वेग दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

लोकसभेत (Lok Sabha) दोन तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह विरोधकांकडून बेरोजगारीमुळे तरूणांनी हे कृत्य केल्याचा दावा केला आहे. युवक काँग्रेसकडून बेरोजगारीच्या मुद्यावर आज दिल्लीत निदर्शनेही करण्यात आली. याअनुषंगाने केंद्र सरकारकडून (Central Government) आलेल्या उत्तराला महत्व आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : ...तर तपास केला जाईल! पन्नूच्या हत्येच्या कटावर मोदी पहिल्यांदाच बोलले

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात भरतीबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारी विभागांमधील रिक्त जागा भरण्यासाठी रोजगार मेळावे हे महत्वाचे पाऊल आहे. देशभरात हे मेळावे होत असून मंत्रालय, विभाग, तसेच केंद सरकारच्या इतर आस्थापनांमध्ये नवीन नियुक्त्या दिल्या जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वेगवेगळी मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. सर्व रिक्त पदे मिशन मोडवर भरली जात आहेत. देशात रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्याला केंद्र सरकारचे प्राधान्य असल्याचे सिंग यांनी उत्तरात सांगितले आहे. त्याचप्रमाणे केंद सरकारने व्यवसायवृध्दीसाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणाही केल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

PM Narendra Modi
Parliament Winter Session : नितीन गडकरींसह सर्व मंत्री, भाजप खासदारांनी 12 मिनिटे उभे राहून केले कामकाज...

देशात वेगवेगळ्या क्षेत्रांत रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अनेक पॅकेज व योजनांचा उल्लेखही मंत्र्यांनी केला आहे. त्यामध्ये आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, उत्पादन प्रोत्साहन योजना, पंतप्रधान गतीशक्ती, पंतप्रधान मुद्रा योजना आणि पंतप्रधान पथविक्रेते आत्मनिर्भर निधी आदी योजना येतात.

केंद्र सरकारचे मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी मिशन, अटल मिशन, सर्वांसाठी घर हे महत्वाकांक्षी प्रकल्प देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असल्याचे सिंग यांनी उत्तरात नमूद केले आहे.

(Edited By - Rajanand More)

PM Narendra Modi
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा लोकसभेतील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल... मिमिक्री प्रकरण तापलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com