Rahul Gandhi, Rajnath Singh Sarkarnama
देश

Rahul Gandhi Video : राहुल गांधींची संसदेत ‘गांधीगिरी’; राजनाथ सिंह यांना दिले गुलाब अन्...

Rahul Gandhi Gives Rose to Rajnath Singh in Parliament : काँग्रेसकडून दररोज संसदेच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी मुद्द्यावरून आंदोलन केले जात आहे.

Rajanand More

New Delhi News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून सातत्याने कामकाज तहकूब करावे लागत आहे. काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील संबंधांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. तसेच संसदेबाहेरही प्रतिकात्मक आंदोलन करून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेससह इंडिया आघाडीतील काही घटकपक्षांच्या खासदारांनी बुधवारी भाजप खासदारांना गुलाब आणि तिरंगा देत प्रतिकात्मक आंदोलन केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना गाठत तिरंगा आणि गुलाब पुष्प दिले. संसदेचे कामकाज चालू देण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांना केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

मोदी सरकार अदानींना वाचवण्यासाठी संसदेचे कामकाज सातत्याने तहकूब करत आहे. त्यामुळे देशातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकत नाही. त्यासाठी आज काँग्रेस खासदारांनी भाजप खासदारांना तिरंगा आणि गुलाब देऊन संसदेची प्रतिष्ठा कायम राखणे आणि कामकाज चालू देण्याचे आवाहन करण्यात आले.

राज्यसभेत गदारोळ

विरोधकांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावरून केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि किरण रिजिजू यांनी राज्यसभेत विरोधकांवर जोरदार आसूड ओढले. मागील ७२ वर्षांत पहिल्यांता उपराष्ट्रपतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून काँग्रेसने राज्यसभेच्या प्रतिष्ठा मलीन केल्याचा आरोप रिजिजू यांनी केला.

त्याचप्रमाणे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि अमेरिकेतील उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यातील कनेक्शनच्या मुद्द्यावरूनही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. देशाला नुकसान पोहचवणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नड्डा यांनीही या मुद्दयावर सोनिया गांधी आणि काँगेसवर जोरदार टीका केली. त्यावरून मोठा गदारोळ झाल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT