Kareena Kapoor Meet PM : तैमूर अन् जहांगीरसाठी करिनाने घेतली पंतप्रधान मोदींकडून 'ही' खास भेट

Kapoor family Meets Narendra Modi : रणबीर कपूर, आलिया भट्ट, करिना कपूर, सैफ अली खान, करिष्मा कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर सहानी, आदर जैन हे सर्वजण पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्यावेळी उपस्थित होते.
Kareena Kapoor | Narendra Modi
Kareena Kapoor | Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित चित्रपट महोत्सवासाठी पंतप्रधानांना आमंत्रित करण्यातसाठी बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांसह कपूर कुटुंबियांनी 10 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान अभिनेत्री करिना कपूरने तिच्या दोन्ही मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास ऑटोग्राफ घेतला. मोदींनी टीम (तैमूर) आणि जेह या दोन्ही मुलांची नावं लिहित एका कागदावर त्यांचा ऑटोग्राफ दिला. करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये हा फोटो शेअर केला आहे. यावेळी रणबीर कपूर, आलिया भट्ट, करिना कपूर, सैफ अली खान, करिष्मा कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर सहानी, आदर जैन हे सर्वजण यावेळी उपस्थित होते.

Kareena Kapoor | Narendra Modi
MLA Vinay Kore : मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या आमदार कोरेंना पहिला दणका; साखर कारखान्यावर होणार कारवाई?

कपूर कुटुंब दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात राज कपूर यांचे 10 चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.

Kareena Kapoor | Narendra Modi
Beed Murder Case News : मस्साजोग सरपंच खून प्रकरण; पंकजा मुंडे 'मोठा मुद्दा' घेऊन CM फडणवीसांना भेटणार

करिना कपूर-करिश्मा आणि इतर सदस्यांनी पंतप्रधानांसोबतच्या त्यांच्या भेटीचे कधीही न पाहिलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत करिश्मा कपूरनेही पंतप्रधान मोदींकडून मुलांचा ऑटोग्राफ घेतला. कपूर कुटुंबाने पंतप्रधानांचे मनापासून आभार मानले आहेत.

कोणते चित्रपट दाखवले जातील?

13 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या या अनोख्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये राज कपूर अभिनीत एकूण 10 चित्रपट दाखवले जाणार आहेत. PVR-Inox आणि Cinepolis थिएटरमध्ये स्क्रिनिंग होणार असून, तिकीटाची किंमत 100 रुपये ठेवण्यात आली आहे.

ज्यात 'आग', 'बरसात', 'आवारा', 'श्री 420' आणि 'मेरा नाम जोकर' सारख्या कालातीत क्लासिक चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीवर छाप सोडलेले हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com