Priyanka Gandhi, Nitin Gadkari Sarkarnama
देश

Parliament Winter Session : लोकसभेत गडकरींचे आसन 58 वरून 4 क्रमांकावर, प्रियांका गांधी चौथ्या रांगेत; कुणाला कुठे मिळाली जागा?

Lok Sabha Seating Arrangement Changes : काही दिवसांपूर्वी लोकसभेत सदस्यांच्या बसण्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुन्हा काही बदल करण्यात आला आहे.

Rajanand More

New Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला मागील आठवड्यात सुरूवात झाली आहे. याच अधिवेशनात 18 व्या लोकसभेतील सदस्यांच्या बसण्याच्या जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा क्रमांक एकच्या आसनावर असणार आहेत. तर पहिल्यांदाच संसदेत दाखल झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना चौथ्या रांगेत स्थान मिळाले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या यादीत 58 क्रमांकाचे आसन देण्यात आली होते. त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली असून गडकरींना चौथ्या क्रमांकाचे आसन देण्यात आले आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या आसनावर अनुक्रमे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह असतील.

‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार 29 नोव्हेंबर रोजी लोकसभेतील आसनव्यवस्थेची यादी प्रसिध्द करण्यात आली होती. यामध्ये आसन क्रमांक चार आणि पाचसमोर कुणाचेही नाव नव्हते. नव्या यादीत सुधारणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा या ज्येष्ठ मंत्र्यांच्या जागा रिकाम्या राहतील.

विरोधी बाकांवर कोण कुठे बसणार?

विरोधी पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांच्या आसनव्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आला नाही. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आसनक्रमांक 498 असेल. तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव 355 क्रमांकाच्या आसनावर बसतील. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदीप बंदोपाध्याय यांना 354 क्रमांकाचे आसन देण्यात आले आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल हे राहुल गांधींच्या शेजारी बसतील.

सपाचे खासदार अवेधश प्रसाद यांच्या जागेत बदल करण्यात आला आहे. त्यांना दुसऱ्या रांगेत 357 क्रमांकाचे आसन देण्यात आले आहे. त्यांच्या शेजारी डिंपल यादव असतील. प्रियांका गांधी चौथ्या रांगेत बसणार असून त्यांचा आसन क्रमांक 517 हा आहे. त्यांच्या शेजारी काँग्रेसचे खासदार अडूर प्रकाश आणि प्रद्युत बोरदोलोई बसणार आहेत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात 19 आसनांचे अंतर असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT