New Delhi : पुढील पाच वर्षांत देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाबाबत मोठे वृत्त आहे. हे विधेयक मंगळवारी लोकसभेत सादर केले जाणार आहे. त्यासाठी भाजपने आपल्या खासदारांना व्हीप जारी करून सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मोदी सरकारसाठी हे विधेयक अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘एक देश एक निवडणूक’साठी आग्रही आहेत. त्यामुळे हे विधेयक संसदेत पारित करण्यासाठी भाजप आणि एनडीएकडून जोर लावला जाणार, हे स्पष्ट आहे. मागील आठवड्यातच केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच सरकार हे विधेयक मंजुरीसाठी सादर करणार, अशी चर्चा होती.
देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक घ्यायची असल्यास हे विधेयक संसदेत पारित होणे आवश्यक आहे. सध्या सरकारकडे लोकसभेसह राज्यसभेतही बहुमत आहे. त्यामुळे सरकारला फारशी अडचण येणार नाही. मात्र, चालू अधिवेशनातच विधेयक मंजूर होणार नाही, अशी शक्यता आहे. अधिवेशन आणखी केवळ चार दिवस चालणार आहे. हे विधेयक महत्वाचे असल्याने चार दिवसांत त्यावर चर्चा पूर्ण होणार नाही.
विधेयकाला विरोधकांकडून कडाडून विरोध केला जाणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे सरकारकडून त्यासाठी रणनीती आखण्यात आली असेल. मंगळवारी विधेयक सादर केल्यानंतर याबाबत स्पष्टता येईल. दरम्यान, 'वन नेशन, वन इलेक्शन' संदर्भात कायदा करण्याची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू होती. त्याला अखेर अंतिम स्वरुप आल्याचे स्पष्ट झाले आहे.
एक देश एक निवडणुकाच्या प्रस्तावामध्ये कोविंद समितीने अनेक महत्वाच्या शिफारशी केल्या होत्या. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक एकाचवेळी 2029 मध्ये घेण्याची महत्वाची शिफारस आहे. एकाचवेळी निवडणूक घेतल्यास खर्चात मोठी कपात होईल, असे अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे सातत्याने होत असलेल्या निवडणुकांमुळे सुरक्षा यंत्रणा व प्रशासनावरही ताण पडतो. हा ताणही कमी होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.