India Vs Pakistan : पाकिस्तानवरील विजयाचा ‘तो’ ऐतिहासिक फोटो मोदी सरकारने हटवला! लोकसभेत पडसाद

Parliament Winter Session Defence Minstry Priyanka Gandhi Lok Sabha India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमधील 1971 च्या युध्दात पाकिस्तानचे सैन्य शरण आले होते.  
India Pakistan War
India Pakistan WarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 मध्ये झालेल्या युध्दानंतर पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्करली होती. या युध्दाप्रमाणेच त्यावेळचा एक फोटोही ऐतिहासिक ठरला होता. शरणागतीच्या कागदपत्रांवर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सही करतानाचा हा फोटो होता. या फोटोवरून आता वाद निर्माण झाला आहे.

दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात अनेक वर्षांपासून हा ऐतिहासिक फोटो लावण्यात आला होता. आता हा फोटो काढून त्याजागी दूसरा फोटो लावण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी सोमवारी लोकसभेत नाराजी व्यक्त केली. आज विजय दिनाचे औचित्य साधून त्यांनी या फोटोचा मुद्दा उपस्थित केला.

India Pakistan War
Parliament Winter Session : सोनिया गांधींकडील 51 खोक्यांमध्ये कोणते गुपित? नेहरूंच्या ‘खास’ पत्रांवरून लोकसभेत हंगामा

प्रियांका गांधी म्हणाल्या, पाकिस्तानचे सैन्य भारतीय सैन्यसमोर आत्मसमर्पण करत असल्याचा फोटो  सैन्यदलाच्या मुख्यालयातून हटवण्यात आला आहे. ही खूप दुर्दैवी बाब आहे. तो फोटो भारताच्या नेतृत्वाचा आणि सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाचा ऐतिहासिक फोटो आहे. हा फोटो पूर्वीच्या जागी लावला जावा, अशी मागणी प्रियांका गांधींनी केली.

दरम्यान, 1971 मध्ये 3 डिसेंबर रोजी सुरू झालेले युद्ध 16 डिसेंबर रोजी संपले होते. पाकिस्तानच्या 90 हजार सैन्याने भारतासमोर शरणागती पत्करली होती. पाकिस्तानचे तत्कालीन पूर्व विभाग प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. ए. के. नियाझी यांनी भारतीय लष्कराचे तत्कालीन पूर्व विभाग प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यासमोर शरणागतीच्या कागदपत्रांवर सही केली होती. ही सही करणाचा फोटो ऐतिहासिक ठरला.

India Pakistan War
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्येचे पडसाद थेट लोकसभेत; मोदी सरकार दखल घेणार?

सरकारकडून खुलासा नाही

मुख्यालयातून हटवण्यात आलेल्या फोटोबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. नुकताच हा फोटो हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यावर प्रियांका गांधींनी सोमवारी लोकसभेत भाष्य केले. पण अद्याप संरक्षण मंत्रालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. भारत आणि बांग्लादेशातील स्थिती सध्या बिघडलेली आहे. यापार्श्वभूमीवर हा फोटो हटवण्यात आल्याचे समोर आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com