Parliament Winter Session 2022 : संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. कुठल्या मुद्दांवरुन मोदी सरकारला अडचणीत आणायचे, यावर काँग्रेसने काल (शनिवारी) बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत १५ मुद्दांवरुन मोदी सरकारला घेरण्याची रणनीती कॉंग्रेसने आखली आहे. (Parliament Winter Session 2022 News update)
भारत-चीन सीमेवरील घुरखोरी, आर्थिक आरक्षण, महागाई आदी १५ मुद्यांवर संसदेत काँग्रेस आक्रमकपणे आपली बाजू मांडणार आहेत. या विषयावर सरकारला चर्चा करण्यास भाग पाडणार असल्याचे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले. २९ डिसेंबरपर्यत हे अधिवेशन चालणार आहे.
मोदी सरकार या अधिवेशनात १६ विधेयक मांडणार आहेत. यातील बायोलॉजिकल डायवर्सिटीसह तीन संशोधन विधेयकांना काँग्रेस विरोध करणार आहेत. या विधेयकांवर निर्णय घेण्यापूर्वी ते प्रथम स्थायी समितीसमोर ठेवावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मार्गदर्शन केले. अधीर रंजन चौधरी, पी. चिदंबरम आदी यावेळी उपस्थित होते. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत सीमेवरील तणाव, वाढती महागाई, आर्थिक आरक्षण (EWS) सायबर सुरक्षा यावर चर्चा झाली.
आर्थिक आरक्षणावर (EWS) पुन्हा चर्चा करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. सुप्रीम कोर्टाने या आर्थिक आरक्षणाबाबत आपले मत नोंदवले होते. पाच सदस्य असलेल्या खंडपीठाच्या तीन न्यायाधीशांनी आर्थिक आरक्षणाला सहमती दर्शवली आहे तर दोन न्यायाधीशांना याला विरोध दर्शवला आहे.
याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, "आर्थिक आरक्षणाला आमचा विरोध नाही. समाजातील सर्व घटकांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे," जातीनिहाय गणना व्हावी," अशी मागणी जयराम रमेस यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.