Jaiveer Shergill : काँग्रेसमधील हुजेरीगिरीला कंटाळलेल्या युवा नेत्याला भाजपनं दिलं मोठं गिफ्ट !

Jaiveer Shergill bjp national spokesperson : मला जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार व्यक्त करतो.
Jaiveer Shergill
Jaiveer Shergill sarkarnama
Published on
Updated on

Jaiveer Shergill : हुजेरीगिरी, चाटूगिरीला कंटाळून काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिलेल्या युवा नेत्याला भाजपने मोठं गिफ्ट दिले आहे. (jayveer shergill latest news)

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगिल (Jaiveer Shergill) यांनी दोन महिन्यापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शेरगिल यांनी हाती 'कमळ' घेतलं. भाजपमध्ये प्रवेश करतात पक्षश्रेष्ठींनी त्यांची नेमणूक राष्ट्रीय प्रवक्तेपदी केली आहे.

आँगस्टमध्ये शेरगिल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसपक्षश्रेष्ठींकडे तक्रार करीत पक्षातंर्गत गटबाजी, हुजेरीगिरी, चाटूगिरी वर जोरदार हल्ला केला. पक्षातील परिस्थितीची माहिती काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. त्यांनी गांधी यांना पत्र पाठवले होते. पक्षातील ध्येयधोरण ही युवा कार्यकर्त्यांसाठी अयोग्य असल्याचे त्यांनी गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. काही काळापासून ते पक्षासोबत नाखूष होते.

Jaiveer Shergill
Girish Bapat : खासदार गिरीश बापटांच्या मनात नेमकं चाललयं तरी काय ?

३९ वर्षीय जयवीर शेरगिल यांना खांद्यावर भाजपने राष्ट्रीय प्रवक्ता पदाची जबाबदारी दिल्यानंतर शेरगिल यांनी टि्वट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आभार मानले आहे. "मी देशाच्या सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांचे, मला जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार व्यक्त करतो,"असे टि्वट त्यांनी केलं आहे.

Jaiveer Shergill
Smriti Irani : 'भारत जोडो' यात्रेचं नवीन नामकरण ? ; स्मृती इराणींनी उडवली कॉंग्रेसची खिल्ली

कोण आहेत जयवीर शेरगिल..

  • शेरगिल हे मूळचे जालंदरचे असून व्यवसायाने वकील आहेत.

  • 'टॅलेंट हंट'मधून २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

  • २०१४ मध्ये राष्ट्रीय मीडिया पॅनलिस्ट म्हणून निवड करण्यात आली.

  • २०१८ मध्ये राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवडले गेले.

  • छत्तीसगड आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे संवाद समन्वयक म्हणून काम

  • काही राज्यांत ते पक्षाचे स्टार प्रचारक होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com