Jagdeep Dhankhar Sarkarnama
देश

Rajya Sabha : जगदीप धनखड यांनी 70 वर्षांनंतर बदलली नमाजाची वेळ; कामकाजाच्या वेळेत मोठा बदल

Rajanand More

Parliament Winter Session : राज्यसभेतील कामकाजाच्या वेळ बदल करण्यात आला असून आता प्रत्येक शुक्रवारी जेवणाची वेळ दुपारी 1 ते 2 ही असणार आहे. उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धडखड यांनी लोकसभेच्या वेळेप्रमाणेच ही वेळ करण्यात आल्याचे सांगितले. पुर्वी राज्यसभा शुक्रवारी अडीच वाजता तर लोकसभा दोन वाजता सुरू होत होती. राज्यसभेचा 30 मिनिटांचा वेळ दर शुक्रवारी नमाजासाठी राखीव होता.

तमिळनाडूतील (Tamil Nadu) डीएमकेच्या खासदारांनी राज्यसभेत (Rajya Sabha) शुक्रवारी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उपराष्ट्रपतींनी सांगितले की, 60-70 वर्षांपासून चालत आलेल्या या नियमांत आता बदल केला आहे. लोकसभेची कामकाज दुपारी दन वाजता सुरू होते. राज्यसभा व लोकसभा (Lok Sabha) हे संसदेचाच (Parliament) हिस्सा आहेत. त्यामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची वेळ सारखीच हवी. त्यामुळे मी आधीच याविषयी नियम बनवला आहे.

राज्यसभेचे कामकाज शुक्रवारी सुरू असताना खासदार तिरुची शिवा यांनी नमाजाच्या वेळेचा मुद्दा उपस्थित केला होता. सामान्यपणे शुक्रवारी जेवणाच्या वेळेनंतर सभागृह 2.30 वाजता सुरू होते. पण आजच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार दोन वाजताच सुरू झाले. याविषयी कधी निर्णय घेतला, हा बदल का केला, असा प्रश्न शिवा यांनी उपस्थित केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार मोहम्मद अब्दुल्ला यांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. मागील 60-70 वर्षांपासून ही परंपरा होती. अडीच वाजताची वेळ आधीपासून ठरवली आहे. मुस्लिम सदस्यांसाठी ही नमाजाची वेळ होती. हीच परंपरा आहे. यावर पुन्हा एकदा सभापतींनी उत्तर दिले.

लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहातील सदस्य समाजातील सर्व वर्गातून येतात. लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजता सुरू होते. ज्यामध्ये सर्व समाजातील सदस्य आहेत. त्यानुसार मी मागील वर्षीच याविषयी नियम बनविले आहेत. त्यामध्ये जेवणाच्या वेळेनंतर राज्यसभेचे कामकाज लोकसभेप्रमाणेच दुपारी दोन नंतर सुरू करायचे होते, असे सभापतींनी स्पष्ट केले.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT