Karnataka Politics: मोठी बातमी! कर्नाटकमध्येही लवकरच 'ऑपरेशन लोटस'? कुमारस्वामींच्या दाव्याने खळबळ

HD Kumaraswamy and CM Siddaramaiah : कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली
HD kumaraswamy On CM Siddaramaiah
HD kumaraswamy On CM Siddaramaiah Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka News: "कर्नाटकमध्ये लवकरच 'ऑपरेशन लोटस' होणार असून महाराष्ट्रासारखे कर्नाटकमध्येही काही होऊ शकते",असा मोठा दावा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

"सत्ताधारी काँग्रेसच्या एका प्रभावशाली मंत्र्याला केंद्राने आपल्यावर दाखल केलेले गुन्हे टाळायचे असल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. एवढंच नाही तर मंत्री 50 ते 60 आमदारांसह काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असून चर्चा सुरू आहे", असा मोठा दावा कुमारस्वामींनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"कर्नाटकमधील (Karnataka) काँग्रेसच्या सरकारमध्ये सर्व काही ठीक चाललेलं नाही. त्यामुळे हे सरकार कधी पडेल माहीत नाही. काँग्रेसचा एक मंत्री 50 ते 60 काँग्रेस आमदारांच्या पाठिंब्याने भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे काहीही होऊ शकते. सध्या कोणामध्येही प्रामाणिकपणा शिल्लक नाही", असंही कुमारस्वामी म्हणाले.

कुमारस्वामी यांना या नेत्याच्या नावासंदर्भात विचारले असता त्यांनी मात्र, नाव सांगण्याचे टाळले. मात्र, "कर्नाटकमध्ये महाराष्ट्रासारखे काहीतरी कधीही घडू शकते", असे त्यांनी म्हटले. दरम्यान, कुमारस्वामी यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. तसेच काँग्रेस (Congress) सरकारमधील हा मंत्री नेमकं कोण ? याबाबत आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

(Edited by-Ganesh Thombare)

HD kumaraswamy On CM Siddaramaiah
Madhya Pradesh New CM : नवा चेहरा की शिवराजच ? मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याबाबत आज होणार फैसला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com