Rajya Sabha MP oath : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली. यावेळी पार्थ यांनी अजित पवारांचे जॅकेट आणि चष्मा घालत त्यांच्या आठवणी जपल्या. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस खूपच भावनिक ठरला.
पार्थ पवार यांच्या सदस्यत्वाच्या शपथेवेळी त्यांच्या आई उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांचीही यावेळी उपस्थिती होती.
पार्थ पवार यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी उपराष्ट्रपतींना पहिला नमस्कार केला. त्यानंतर उपराष्ट्रपतींना त्यांना जवळ बोलवून शुभेच्छा दिल्या. ''खूप खूप अभिनंदन. देव तुम्हाला शक्ती देवो. वडिलांचा वारसा तुम्ही पुढे चालवा'', असे उपराष्ट्रपती राधाकृष्णन पार्थ पवारांना म्हणाले.
पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. पार्थ अजितदादा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत लोकसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली.
जनतेच्या विश्वासाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या माध्यमातून तरुण नेतृत्वाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करते. लोकहित, विकास आणि जनकल्याण यांना केंद्रस्थानी ठेवून ते संसदेत प्रभावीपणे कार्य करतील, अशी खात्री आहे, अशी भावना सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला.
पार्थ पवारांनीही सोशल मीडियातून आपली भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, जनतेचा विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा लक्षात ठेवून राज्यसभेत प्रभावीपणे आवाज उठवण्याचा, जनतेची बाजू मांडण्याचा व देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.